सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:10 PM2018-05-22T19:10:17+5:302018-05-22T19:10:27+5:30

पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला.

The cyber-bandit looted eight lakhs in Nagpur | सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

Next
ठळक मुद्देदिल्लीहून येत होते सर्व फोनसलग तीन वर्ष गंडवले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१४ ते २०१७ या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली. प्रमोदिता अजय रामटेके (वय ५२) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या सेमिनरी हिल्समधील गजानन प्रसाद सोसायटीत राहतात. २१ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ च्या सुमारास त्यांना एका आरोपीचा फोन आला. त्याने त्याचे नाव संजयसिंग (दिल्ली) सांगितले.
९८९११ २९६९१ या मोबाईल नंबरवरून बोलणाऱ्या आरोपीने रिलायन्सची पॉलिसी २९,५०० रुपयात काढल्यास तातडीने पाच लाखांचे कर्ज मिळेल. पॉलिसीचा जो अवधी राहील, तेवढ्याच अवधीत तुम्ही थोडे थोडे करून कर्जाचे हप्ते भरू शकता, असे आरोपी म्हणाले. त्यामुळे रामटेके यांनी लगेच आरोपीने सांगितलेल्या खात्यात २९,५०० रुपये जमा केले. त्याने तशी पॉलिसीची कागदपत्रे रामटेके यांना पाठविली. यानंतर कर्जासाठी अर्ज केला असता आरोपीने टॅक्स जमा करून म्हणून ४८,९९९ रुपये जमा करायला लावले. पुढे याच संजयसिंग नामक आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून ९७१८४८ ३१४८या क्रमांकावरून तर नंतर त्याचे साथीदार अजित जोशी, मनीष म्हलोत्राने ९७१८४८ ३१४८, नेहा शर्मा हिने ९६४३२७१०१८, दत्तूप्रसाद पाठक याने ९१३६२३३४८१६ शोभीत राय ८४४७५९०५८१, फजिल शर्मा ८४५९९५९६९५८, पराग राव, अभिषेक वर्मा ८४५९४८ ७३६५, अंजली मेहरा हिने ७८३६०२१८१९, ८५१०८००२६२, नागपालने ९५६०८४११०६, विजय भारद्वाजने ७८३६०३३६८९ नसिम सिद्धीकी आणि त्याचा एक साथीदार अशा एकूण १४ जणांनी (सर्व रा. दिल्ली) २०१४ ते जून २०१७ पर्यंत वेळोवेळी फोन केले. प्रत्येकवेळी ते कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळी सबब सांगून रक्कम जमा करायला सांगत होते. तर आपण एवढी रक्कम जमा केली. ती परत मिळेल, या आशेने रामटेके आरोपीने सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा करीत होत्या. एकूण ८ लाख, ५२ हजार, ८९३ रुपये जमा करूनही आरोपी पुन्हा पैसे भरा असेच सांगत होते. अखेर रामटेकेंनी रक्कम जमा करण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला.

सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रामटेके नोव्हेंबर २०१७ मध्ये गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्या. गिट्टीखदान पोलिसांनी त्यांना सीताबर्डी ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्या सीताबर्डीत पोहचल्या. ठाणेदार हेमंत खराबे आणि त्यांचे सहकारी पीएसआय कविकांत चौधरी यांनी रामटेकेंची कैफियत ऐकून त्यांना व्यवस्थित तक्रार अर्ज लिहून देण्यास तसेच फसवणुकीचे सर्व पुरावे एकत्र जोडून देण्यास मदत केली. नंतर प्रकरण गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. येथे पीएसआय मुकेश राठोड यांनी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

Web Title: The cyber-bandit looted eight lakhs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.