सायबर सेलने ग्राहकाचे ६.८२ लाख परत मिळवून दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:42+5:302021-06-22T04:07:42+5:30

००००० हुडकेश्वरमध्ये १.६० लाखांची चोरी नागपूर : हुडकेश्वरमधील न्यू सूभेदार ले-आऊट परिसरातील एका बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात ...

Cyber cell retrieves Rs 6.82 lakh from customers | सायबर सेलने ग्राहकाचे ६.८२ लाख परत मिळवून दिले

सायबर सेलने ग्राहकाचे ६.८२ लाख परत मिळवून दिले

Next

०००००

हुडकेश्वरमध्ये १.६० लाखांची चोरी

नागपूर : हुडकेश्वरमधील न्यू सूभेदार ले-आऊट परिसरातील एका बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपयांच्या सामानाची चोरी केली. फ्लॅट निवासी अजय वासुदेव तळवेकर (५५) हे सकाळी ११ वाजता वर्धा येथे गेले होते. त्यांची पत्नी आणि पत्नी मुलगा काटोलला गेले होते. सोमवारी २१ जूनला परतल्यावर कुलूप तुटलेले दिसले. चोरट्याने आलमारीत ठेवलेल्या १ लाख ६० हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

०००००

नशेतील युवकावर हल्ला

नागपूर : नशेच्या धुंदीत शिवीगाळ करणाऱ्या युवकाला बजरिया चौकात लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. स्वप्निल सोनटक्के (३२) असे या नशेखोराचे नाव आहे. शुभम साहू हा रविवारी रात्री आपला लहान भावासोबत भाजी खरेदी करण्यासाठी बजरिया चौकात आला होता. भाजी खरेदी करत असताना स्वप्निल नशेमध्ये लोकांना वाईट शिवीगाळ करीत होता. त्याने शुभमच्या लहान भावाला थापडा मारल्या. यामुळे संतप्त झालेल्या शुभमने लाकडी दांड्याने त्याला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cyber cell retrieves Rs 6.82 lakh from customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.