सायबर गुन्हेगाराचे खाते गोठवले, ८.१२ लाख मिळविले

By दयानंद पाईकराव | Published: June 29, 2024 04:19 PM2024-06-29T16:19:19+5:302024-06-29T16:20:29+5:30

सायबर पोलिसांची कारवाई : टास्कच्या नादात इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने गमावले होते १४.६२ लाख

Cyber criminal's account frozen, 8.12 lakhs recovered | सायबर गुन्हेगाराचे खाते गोठवले, ८.१२ लाख मिळविले

Cyber criminal's account frozen, 8.12 lakhs recovered

नागपूर : खाजगी इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने टास्कच्या नादात १४ लाख ६२ हजार ५०९ रुपये ऑनलाईन गमावले. परंतु सायबर पोलिसांनी वेळीच सुत्रे हलविली आणि आरोपीचे खाते गोठवून ८ लाख १२ हजार ९७९ रुपये परत मिळविले आहेत.

आशिष भिमराव पौनीकर (३१, रा. भाग्यश्रीनगर, खरबी रोड, रमणा मारुती) हे खाजगी इन्शुरन्स कंपनीत कर्मचारी आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांच्या मोबाईलवर टेलिग्रामवर यु कॅन स्टार्ट पार्ट टाईम जॉब असा मॅसेज आला. पौनीकर यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता अज्ञात आरोपीने त्यांना स्काय स्कॅनर नावाच्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून वेगवेगळे टास्क दिले. हे टास्क पूर्ण करण्यासाठी पौनीकर यांनी आरोपीच्या वेगवेगळ्या खात्यावर १४ लाख ६३ हजार ४०९ रुपये ऑनलाईन पाठविले. परंतु आरोपीने पौनीकर यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय भिसे, पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक शंकर पांढरे, दत्तात्रय निनावे, गजानन मोरे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, सहकलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सायबर पोलिसांनी त्वरीत कारवाई करून आरोपीचे विविध बँक खाते गोठविले. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया करून ८ लाख १२ हजार ९७९ रुपये पौनीकर यांना परत केले.

Web Title: Cyber criminal's account frozen, 8.12 lakhs recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.