कस्टमर केअर क्रमांकावरून सायबर फसवणूक; प्राध्यापिका झाली शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 07:42 PM2021-12-15T19:42:53+5:302021-12-15T19:43:17+5:30

Nagpur News क्रेडिट कार्डचे बिल कमी करण्यासाठी कस्टमर केअर क्रमांकावर फोन केला असता गुन्हेगारांनी एका प्राध्यापिकेची एका लाखाने फसवणूक केली.

Cyber fraud from customer care numbers; The professor went hunting | कस्टमर केअर क्रमांकावरून सायबर फसवणूक; प्राध्यापिका झाली शिकार

कस्टमर केअर क्रमांकावरून सायबर फसवणूक; प्राध्यापिका झाली शिकार

Next

 

नागपूर : क्रेडिट कार्डचे बिल कमी करण्यासाठी कस्टमर केअर क्रमांकावर फोन केला असता गुन्हेगारांनी एका प्राध्यापिकेची एका लाखाने फसवणूक केली. ही घटना बजाजनगर ठाण्यांतर्गत घडली असून आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे.

अनु पिल्लई या महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. त्यांच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड आहे. त्यांना क्रेडिट कार्डचे नोव्हेंबर महिन्याचे बील अधिक आल्याची शंका आली. त्यांनी गुगलवरून एसबीआयच्या क्रेडिट कार्डचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. १३ नोव्हेंबरला त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी पिल्लई यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर त्या क्रमांकावरून त्यांना कॉल आला. त्या व्यक्तीने आपण अधिकारी असल्याचे सांगून पिल्लई यांना एनी डेस्क अप्लिेकेशन पाठविले. त्याने ते अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या अप्लिकेशनमध्ये पिल्लई यांनी बँक खात्याची माहिती टाकली.

एनी डेस्क अप्लिकेशनमध्ये मोबाईलची क्लोनिंग होऊन त्यात संपूर्ण माहितीची नोंद होऊन सायबर गुन्हेगाराला ती माहिती मिळते. या माहितीच्या आधारे सायबर गुन्हेगाराने पिल्लई यांच्या खात्यातून एक लाख रुपये ट्रान्सफर केले. पिल्लई यांनी या घटनेची सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. तपासानंतर मंगळवारी बजाजनगर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सायबर गुन्हेगारांनी बँक किंवा दुसऱ्या आवश्यक कस्टमर केअर क्रमांक म्हणून आपले मोबाईल क्रमांक टाकले आहेत. गुगलवर सर्च केल्यानंतर आरोपी या क्रमांकावर संपर्क साधून आरोपीचा शिकार होतात. अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडत आहेत.

................

Web Title: Cyber fraud from customer care numbers; The professor went hunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.