सायबर गुन्हेगाराने उडवले बँक खात्यातील साडेचार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 09:26 PM2021-12-18T21:26:53+5:302021-12-18T21:27:25+5:30

Nagpur News बँकेचे ॲप काम करत नसल्याची तक्रार करायला गेलेल्या व्यक्तीला ४.५ लाखांचा फटका बसल्याची घटना नागपुरात घडली.

Cybercriminals stole Rs 4.5 lakh from bank accounts | सायबर गुन्हेगाराने उडवले बँक खात्यातील साडेचार लाख

सायबर गुन्हेगाराने उडवले बँक खात्यातील साडेचार लाख

Next

नागपूर : यशोधरानगरातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने साडेचार लाख रुपये उडविले. ३ डिसेंबरला घडलेल्या घटनेची तक्रार अमितकुमार विष्णुदेव प्रसाद (वय ३९) यांनी शुक्रवारी पोलिसांकडे नोंदवली.

प्रसाद यांच्या तक्रारीनुसार, ते भिलगावच्या गोकुलनगरीत राहतात. ३ डिसेंबरला दुपारी १ ते ३ च्या दरम्यान त्यांचे स्टेट बँकेचे योनो ॲप काम करत नसल्याने त्यांनी कस्टमर केअरवर संपर्क साधला. तो फोन अटेंड करणाऱ्या भामट्याने एक लिंक पाठवली. ती ओपन करून त्यात प्रसाद यांनी आपल्या बँक खात्याची माहिती पाठवली असता सायबर गुन्हेगाराने प्रसाद यांच्या बँक खात्यातील साडेचार लाखांची रोकड काढून घेतली. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर प्रसाद यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Cybercriminals stole Rs 4.5 lakh from bank accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.