दाेन्ही आराेपीस चार दिवसांचा ‘पीसीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:12+5:302021-06-22T04:07:12+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : शुभम माेतीराम ठवकर, रा. गांगापूर, उमरेड याच्या खून प्रकरणात उमरेड पाेलिसांनी दाेघांना अटक केली. ...

Daenhi Arapi's four-day 'PCR' | दाेन्ही आराेपीस चार दिवसांचा ‘पीसीआर’

दाेन्ही आराेपीस चार दिवसांचा ‘पीसीआर’

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : शुभम माेतीराम ठवकर, रा. गांगापूर, उमरेड याच्या खून प्रकरणात उमरेड पाेलिसांनी दाेघांना अटक केली. या दाेन्ही आराेपींना उमरेड येथील न्यायालयाने चार दिवसांची अर्थात गुरुवार (दि. २४) पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. खुनाची घटना रविवारी (दि. २०) सायंकाळी घडली असून, या दाेन्ही आराेपींना दहेगाव (ता. उमरेड) परिसरातून रविवारी रात्री अटक केली हाेती.

शोएब ऊर्फ जॉनी शाहीद शेख (१९) व विक्रांत ऊर्फ विक्की महेंद्रसिंग चंदेल (२२) दाेघेही रा. गांगापूर, उमरेड अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. शुभमचे वर्षभरापूर्वी लग्न झाले हाेते. शुभम व शाेएब ट्रकचालक असून, ते वेकाेलिच्या खाणीतील काेळशाची वाहतूक करायचे. या दाेघांमध्ये काही दिवसांपूर्वी कागदपत्रांवरून जाेरदार भांडण झाले हाेते. याच भांडणातून पूर्वी त्यांनी एकमेकांना मारहाणही केली हाेती. घटनेच्या आदल्या दिवशी (शनिवार, दि. १९) शाेएबने शुभमला त्याच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. त्याअनुषंगाने शुभमने शाेएबच्या विराेधात पाेलीस तक्रार नाेंदविली हाेती.

दरम्यान, शाेएब व विक्रांत या दाेघांनी गांगापूर चाैकात शुभमला जबर मारहाण करीत त्याच्या डाेक्यावर फरशीने वार केले. त्यात शुभमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना घटनेच्या काही तासातच दहेगाव परिसरातील जंगली भागातून अटक केली. त्यांना साेमवारी सकाळी उमरेड येथील न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहायक पाेलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी दिली.

Web Title: Daenhi Arapi's four-day 'PCR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.