दक्षिणायनच्या ‘समास’चा उद्या नागपुरात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:05 PM2018-01-29T20:05:10+5:302018-01-29T20:15:24+5:30

सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षा हे ब्रीद घेऊन दक्षिणायनने सुरू केलेल्या ‘समास २०१८’ या अभियानाचा समारोप ३० जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे.

Dakshina's 'Samas' is concluded today in Nagpur | दक्षिणायनच्या ‘समास’चा उद्या नागपुरात समारोप

दक्षिणायनच्या ‘समास’चा उद्या नागपुरात समारोप

Next
ठळक मुद्देदीक्षाभूमीवरून निघणार मौन पदयात्राप्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी, गणेश देवी यांच्यासह देशभरातील लेखक, विचारवंत, पत्रकार व कलावंतांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्य-अहिंसा व संविधान सुरक्षा हे ब्रीद घेऊन दक्षिणायनने सुरू केलेल्या ‘समास २०१८’ या अभियानाचा समारोप ३० जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, महात्मा गांधी यांचे नातू व विचारवंत राजमोहन गांधी, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत गणेश देवी, रावसाहेब कसबे याच्यासह देशभरातील लेखक, साहित्यिक, विचारवंत व कलावंत या समारोपीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
या अभियानांतर्गत ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दक्षिणायनचे लेखक, पत्रकार व कलावंत हे नागपुरातील तब्बल २० महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांशी ‘वर्तमान समजून घेतांना’ या विषयावर संवाद साधतील. दुपारी ४ वाजता दीक्षाभूमी ते धनवटे नॅशनल कॉलेजपर्यंत ( व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी पुतळा मार्गे ) मौन पदयात्रा काढण्यात येईल. यानंतर धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होईल. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे हे अध्यक्षस्थानी राहतील. तर के. नीला (कर्नाटक), उत्तम परमार (गुजरात), के.के. चक्रवर्ती (दिल्ली), प्रज्ञा दया पवार (मुंबई), धनाजी गुरव (महाराष्ट्र), जया मेहता (मध्य प्रदेश), दिलीप प्रभुदेसाई (गोवा) प्रामुख्याने उपस्थित राहतील. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी आणि डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
यानंतर सायंकाळी ७ वाजता संभाजी भगत आणि त्यांचे सहकारी कलावंत यांचा शाहिरीचा कार्यक्रम होईल.

Web Title: Dakshina's 'Samas' is concluded today in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.