नागपूर विभागात अजूनही धरणे कोरडीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:39 PM2018-07-07T23:39:49+5:302018-07-07T23:40:46+5:30
शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ जुलै रोजी केवळ २१.६६ टक्के इतकाच जलसाठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. सहा तासात २६३.५ मिमी विक्रमी पाऊस पडला. वडगाव-नांद धरणातील दरवाजे उघड्याची वेळ आली. मात्र धरणक्षेत्रात पाऊस कमी असल्याने नागपूर विभागातील धरणे अजूनही कोरडीच आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७ जुलै रोजी केवळ २१.६६ टक्के इतकाच जलसाठा आहे.
नागपूर विभागात १८ मोठे प्रकल्प आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता २९६४.४३ दलघमी इतकी असून ७ जुलैपर्यंत यात ६४२.१२ दलघमी (२१.६६ टक्के) इतकाच पाणीसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलडोह धरणाची पाणीसाठा क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात ४६.२० दलघमी म्हणजे ४.५४ टक्के इतका पाणीसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ४७.१२ टक्के, रामटेकमध्ये १९.८७ टक्के, लोवर नांद वणा ४७ टक्के, वडगाव ७४.६५ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.५९ टक्के, सिरपूर ४.९४ टक्के, पूजारी टोला २९.१८ टक्के, कालीसरार १९.१२ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ३३.८५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा २१.६७ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना १५.९८ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २७.९९टक्के, धाम २१.०३ टक्के, पोथरा ६१.४३ टक्के, लोअर वर्धा टप्पा १- १५.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - ७०.१३ बावनथडी १५.७५ टक्के इतकाच पाणीसाठा आहे.
गोसेखुर्द-वडगाव भरले
विभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ गोसेखुर्द टप्पा-१ आणि वडगाव धरणे भरले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा १ हे ७०.१३ टक्के भरले आहेत. याची एकूण पाणीसाठा क्षमता १५०.७७ इतकी असून त्यात आजच्या तारखेला १०५.७७ दलघमी इतका पाणीसाठा आहे. तसेच नागपुरतील वडगाव धरणात ७४.६५ टक्के इतका पाणीसाठा आहे. याची एकूण क्षमता १३५ दलघमी इतकी असून त्यात १००.७८ दलघमी इतका पाणीसाठा आहे. वडगाव धरणाचे २१ पैकी १७ गेट उघडण्यात आले होते. इतका पाण्याचा जोर होता.