नागपूर जिल्ह्यातील ७१८७.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By आनंद डेकाटे | Published: March 20, 2023 07:09 PM2023-03-20T19:09:47+5:302023-03-20T19:10:16+5:30

Nagpur News दोन दिवसांपूर्वी अवळी आलेला पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर झाला असून यात नागपूर जिल्ह्यातील गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याचे एकूण ७१८७.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Damage to crops on 7187.8 hectares in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील ७१८७.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

नागपूर जिल्ह्यातील ७१८७.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

googlenewsNext

नागपूर : दोन दिवसांपूर्वी अवळी आलेला पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर झाला असून यात नागपूर जिल्ह्यातील गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी व भाजीपाल्याचे एकूण ७१८७.८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून लवकरच अंतिम अहवालही सादर केला जाईल.

प्राथमिक अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यात १८ तारखेला प्रचंड पाऊस व गारपीट झाली. त्यापूर्वीही १७ तारखेला व १९ तारखेलाही पाऊस पडला. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातील १३१ गावांमधील तब्बल ८४१० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत. पाऊस व गारपिटीमुळे बाधित झाले आहेत. यात सर्वाधिक २३७४.२ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर हरभरा १६४८.२ हेक्टर, संत्रा १६७४.५ हेक्टर, मोसंबी ११३७.३ हेक्टर आणि ३५४ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.


असे झाले नुकसान
पिक - हेक्टर


गहू - २३७४.२
हरभरा-१६४८.२
संत्रा - १६७४.५
मोसंबी - ११३७.३
भाजीपाला- ३५४

एकूण - ७१८७.८ हेक्टर


नुकसानीचा प्राथमिक अहवालसुद्धा प्राप्त झाला आहे. अंतिम सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. अंतिम अहवालही लवकरच प्राप्त होईल.
-विजया बनकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर

Web Title: Damage to crops on 7187.8 hectares in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस