चिमूर क्रांतीलढ्याचे प्रणेते दामोदर काळे यांचे देहावसान
By admin | Published: May 23, 2017 02:08 PM2017-05-23T14:08:18+5:302017-05-23T14:08:18+5:30
चिमूरचा आवाज या साप्हाहिकाचे संपादक, शिक्षक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दामोदर लक्ष्मण काळे (गुरूजी) यांचे मंगळवार २३ मे रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.
Next
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- १९४२ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासोबतच चिमूर जिल्ह्याला क्रांती जिल्ह्याचा दर्जा लाभावा यासाठी लढणारे त्या लढ्याचे प्रणेते व चिमूरचा आवाज या साप्हाहिकाचे संपादक, शिक्षक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दामोदर लक्ष्मण काळे (गुरूजी) यांचे मंगळवार २३ मे रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.
चिमूरचा क्रांतीलढा हा एक ऐतिहासिक लढा होता. १९४२ साली या लढ्याला विजय मिळून तीन दिवसांसाठी चिमूर हे गाव ब्रिटीश अधिपत्यापासून स्वतंत्र करण्यात आले होते. विशेष म्हणजे या घटनेची माहिती सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिनच्या रेडिओस्टेशनवरून प्रसारित केली होती.