मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 01:15 AM2020-03-22T01:15:46+5:302020-03-22T01:16:32+5:30

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

Danger of Corona infection from Mayo! | मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका!

मेयोतून कोरोनाची लागण होण्याचा धोका!

Next
ठळक मुद्देसंशयित रुग्णांना पाठविले जाते ओपीडीत : काही रुग्णांवर रांगेत लागण्याचीही येते वेळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) कोरोना विषाणू संशयित रुग्णांसाठी वेगळी व्यवस्था नाही. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या किंवा बाधित देशातून आलेल्या रुग्णांना सर्वप्रथम मेयोतील बाह्यरुग्ण विभागातूनच (ओपीडी) सामोर जावे लागते. हे रुग्ण पुढे पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.
मेयोमध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी ‘हेल्प डेक्स’ असलातरी तो वॉर्ड क्र. १५ समोर व आकस्मिक कक्षासमोर आहे. मात्र ओपीडी कक्षात या संदर्भात माहिती देणारे किंवा ‘हेल्प डेक्स’ नाही. यामुळे बाधित देशाची पार्श्वभूमी असलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना थेट ‘ओपीडी’ गाठावे लागते. यात प्रथम त्याला नोंदणी कार्डच्या रांगेत नंतर मेडिसीनच्या कक्षाकडे जावे लागते. येथील डॉक्टरच भरतीचे केसपेपर तयार करून वॉर्ड क्र. २४ मध्ये दाखल करतात. मेयोमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्णांसह ६६ संशयित रुग्ण आतापर्यंत दाखल झाले. यातील अनेकांना या प्रक्रियेतून जावे लागले आहे.
नोंदणी कार्डसाठी रांगेत लागावे लागते
एका संशयित रुग्णाने ‘लोकमत’ला सांगितले की, एका बाधित देशातील प्रवासाची पार्श्वभूमी व सर्दी, खोकला व ताप आदी लक्षणे आढळून आल्यावर मेयोत दाखल होण्यासाठी येथील एका जबाबदार डॉक्टरला फोन करून माहिती दिली. परंतु मेयोत आल्यावर त्यांनी ‘ओपीडी’त पाठविले. नोंदणी कार्ड काढण्यासाठी रांगेत लागावे लागले. तिथून मेडिसीन कक्षात पाठविले. तिथे प्रवासाचा इतिहास घेतल्यानंतर वॉर्ड क्र. २४ मध्ये भरती होण्यास सांगितले. सायंकाळी नमुने निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. परंतु या दरम्यान नाईलाजेने ५०वर रुग्णांचा जवळून संपर्क झाला. हे धोकादायक ठरू शकते.

Web Title: Danger of Corona infection from Mayo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.