विदर्भात मृत्यूचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:08 AM2021-04-01T04:08:12+5:302021-04-01T04:08:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत असून मृत्यूचे आकडे कमी होण्याची चिन्हे नाहीत. बुधवारी ...

Danger of death persists in Vidarbha | विदर्भात मृत्यूचा धोका कायम

विदर्भात मृत्यूचा धोका कायम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत असून मृत्यूचे आकडे कमी होण्याची चिन्हे नाहीत. बुधवारी विदर्भातील सर्व जिल्हे मिळून सहा हजार ५० नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, ८५ जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. धुळवडीमुळे मंगळवारचा आकडा कमी असला, तरी बुधवारी परत रुग्णसंख्या सहा हजारांवर गेली आहे. मृत्यूचे एकूण प्रमाण चिंता वाढविणारे आहे.

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५८ बाधितांचे मृत्यू झाले. तर, रुग्णसंख्या दोन हजार ८८५ इतकी होती. भंडारा जिल्ह्यात अनपेक्षितपणे रुग्णसंख्या वाढली. २४ तासांत तेथे ५६६ रुग्ण आढळले व दोन जणांचा मृत्यू झाला. यवतमाळमध्ये ४४१ बाधितांची नोंद झाली व १० रुग्ण मरण पावले. बुलडाण्यात ६३० रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. अमरावतीत मृत्यूसंख्या सहा इतकी होती व २५९ बाधित सापडले. गडचिरोलीत सर्वात कमी ७३ ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले व एकाचा मृत्यू झाला.

जिल्हा : मृत्यू

नागपूर : २८८५ : ५८

गोंदिया : ११६ : ००

भंडारा : ५६६ : ०२

चंद्रपूर : २८० : ०१

वर्धा : ३३६ : ००

गडचिरोली : ७३: ०१

अमरावती : २५९ : ०६

यवतमाळ : ४४१ : १०

वाशिम : २०८ : ००

बुलडाणा : ६३० : ०५

अकोला : २५६ : ०२े

Web Title: Danger of death persists in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.