२ लाख २६ हजार मतदारांची नावे वगळण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:47+5:302021-07-02T04:06:47+5:30

छायाचित्र नसलेले २,४६,९६० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मतदारांनाे सावधान. आपला फोटो मतदार यादीत आहे किंवा नाही याची ...

Danger of deleting names of 2 lakh 26 thousand voters | २ लाख २६ हजार मतदारांची नावे वगळण्याचा धोका

२ लाख २६ हजार मतदारांची नावे वगळण्याचा धोका

Next

छायाचित्र नसलेले २,४६,९६०

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मतदारांनाे सावधान. आपला फोटो मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या, नसेल तर तातडीने आपला रंगीत फोटो १५ जुलैपर्यंत सादर करा, अन्यथा आपण संबंधित पत्त्यावर राहत नाही. आपण स्थलांतरित झाला आहात, असे गृहीत धरून आपली नावे मतदार यादीतून वगळण्याचा धोका आहे. सध्या जिल्ह्यातील तब्बल २ लाख २६ हजार मतदारांनी आपले फोटो सादर केलेले नाहीत.

जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदार संघ आहेत. यात एकूण ४२ लक्ष ३० हजार ३८८ मतदार आहेत. यापैकी तब्बल २ लक्ष ४६ हजार ९६० एवढ्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. सध्या मतदार यादी दुरुस्त करण्याची मोहीम सुरु आहे. या अंतर्गत यादीत फोटो नसलेल्या मतदारांनी आपला रंगीत फोटो संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. ही मोहीम १५ जुलैपर्यंत पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आहे. मोहिमेदरम्यान ११ हजार लोकांनी आपला फोटो जमा केलेला आहे. तर १० हजार लोकांनी अर्ज सादर केला असून त्याची प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच २१ हजार लोकांनी आपला फोटो जमा केलेला आहे. त्यामुळे सध्या २ लाख २६ हजार मतदारांचे फाेटो मतदार यादीत नाही. येत्या १५ तारखेपर्यंत संबंधितांचे फोटो कार्यालयात जमा न झाल्यास ते मतदार सदर पत्त्यावर राहात नाही. ते स्थलांतरित झाले आहेत, असे गृहीत धरून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.

- छायाचित्र समावेश करण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत

मतदार यादी दुरुस्त करण्याची मोहीम सुरु आहे. ५ जुलै हा मोहिमेचा शेवटचा दिवस होता. परंतु तो पुन्हा वाढवण्यात आला आहे. आता १५ जुलै पर्यंत मतदारांना आपले छायाचित्र जमा करता येणार आहे.

-कोट

मतदार यादीत छायाचित्र नसणाऱ्या मतदारांनी आपला रंगीत फोटो संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात तत्काळ जमा करावा. मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची यादी नागपूर डॉट एनआयसी डॉट इन या संकेत स्थळावर, मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात, मतदारांचे संबंधित मतदान केंद्रावर तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तेव्हा १५ जुलैपर्यंत मतदार यादीत आपले रंगीत फोटो जमा करावे.

मिनल कळसकर,

उपजिल्हा निवडणूक अधिकारी

- येथे जमा करा छायाचित्र

-मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)

-मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय

- विधानसभानिहाय

मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले

काटोल २६८,८२७ ३५१४

सावनेर ३,१३,२०७ ३२६५

हिंगणा ३,९२,८५४ ११,२२७

उमरेड २,८९,४५८ १३६०

कामठी ४,५०,७९६ २९,६५६

रामटेक २,७४,०५९ ३,६५८

दक्षिण-पश्चिम नागपूर ३,८५,१८४ २०,१६१

दक्षिण नागपूर ३,७८,७४३ ३६,५९०

पूर्व नागपूर ३,८२,१५७ ३३,३४८

मध्य नागपूर ३,३१,१०५ २८,९५९

पश्चिम नागपूर ३,६८,२६४ २८,२९३

उत्तर नागपूर ३,९५,७३४ ३६,९२९

Web Title: Danger of deleting names of 2 lakh 26 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.