धूलिवंदनातून संसृर्गाचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:41+5:302021-03-28T04:08:41+5:30
भिवापूर : भर उन्हाळ्यात होणारा पाण्याचा अपव्यय आणि नंतर जाणवणारी पांणी टंचाई! दरवर्षीचे हे भीषण दृश्य दाहक असते. त्यामुळे ...
भिवापूर : भर उन्हाळ्यात होणारा पाण्याचा अपव्यय आणि नंतर जाणवणारी पांणी टंचाई! दरवर्षीचे हे भीषण दृश्य दाहक असते. त्यामुळे कृत्रिम रंग आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी धूलिवंदन अगदी साधेपणाने करण्याचा सूर दरवर्षी उमटतो. मात्र गतवर्षीपासून संसर्गजन्य परिस्थितीने होळी व धूलिवंदनाला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. हा संसर्ग होळीचा रंग बेरंग करणारा ठरू शकतोय. त्यामुळे धूलिवंदन खेळू नका, असा लाखमोलाचा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात काहीसा थंडावलेला कोरोना संसर्ग फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा तोंड वर काढत आहे. नागपूर जिल्ह्यात दर दिवशी ४ हजारावर रुग्ण आणि ४० वर मृत्यू कोरोनाच्या दाढेत ओढल्या जात आहे. समूहाने एकत्रित बसणे आणि उठणे धोक्याचे ठरत आहे. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग त्यावर महत्त्वाचा उपाय आहे. मात्र होळी किंवा धूलिवंदन साजरे करताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग पाळल्याच जाऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतोवर समूहाने धूलिवंदन खेळूच नये. रंग लावण्यासाठी होणारी जवळीक टाळणे आवश्यक आहे, असा सूर अभिव्यक्त होत आहे. शनिवार, रविवार, सोमवार तिन्ही दिवस बाजारपेठा आणि बँका बंद असणार आहे. त्यामुळे या तिन्ही दिवशी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळणे फायद्याचे ठरू शकते. प्रशासन आपल्या पद्धतीने नियंत्रणात्मक उपाययोजना राबवीत असले तरी, नागरिकांनीही त्याला सहकार्य करणे अपेक्षित आहे.