इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसाच्या गंभीर रुग्णांना धोका! प्रतिबंधक लस ठरते प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2022 08:00 AM2022-06-22T08:00:00+5:302022-06-22T08:00:02+5:30

Nagpur News दमा असलेल्या किंवा फुफ्फुसाचा जुनाट आजार असलेल्या रूग्णांमध्ये फ्लूचा संसर्ग अधिक गंभीर होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी फ्लू लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बलकी यांचे म्हणणे आहे.

Danger to serious lung patients if infected with influenza! The preventive vaccine is effective | इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसाच्या गंभीर रुग्णांना धोका! प्रतिबंधक लस ठरते प्रभावी

इन्फ्लूएंझाचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसाच्या गंभीर रुग्णांना धोका! प्रतिबंधक लस ठरते प्रभावी

Next
ठळक मुद्देपावसाळ्यात लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार अधिक

नागपूर : पावसाळ्यामध्ये होणाºया आजारांचा सर्वच जण सामना करत असतात. यात सर्वात वरच्या स्थानावर ‘सीझनल फ्लू’ किंवा ‘सीझनल इन्फ्लूएंझा’ या आजाराचे नाव असते. दमा असलेल्या किंवा फुफ्फुसाचा जुनाट आजार असलेल्या रूग्णांमध्ये फ्लूचा संसर्ग अधिक गंभीर होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी फ्लू लसीकरण प्रभावी ठरत असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बलकी यांचे म्हणणे आहे.

-इन्फ्लूएंझा संसगार्मुळे दम्याचा झटका येऊ शकतो

डॉ. बलकी म्हणाले, जरी दमा सौम्य असला किंवा त्यांची लक्षणे औषधोपचाराने नियंत्रित केली गेली तरीही, फुफ्फुसातील इन्फ्लूएंझा संसगार्मुळे दम्याचा झटका येऊ शकतो. यामुळे न्यूमोनिया आणि इतर श्वसन रोग देखील होऊ शकतात. इन्फ्लूएंझा विषाणूचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसाच्या तीव्र आजाराची उपस्थिती देखील मृत्यूचा धोका वाढवते.

-या रुग्णांना फ्लू अधिक जोखमीचे

ज्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत आहे, दीर्घकालीन स्टिरॉइड थेरपी घेत आहेत, हृदयविकार, दमा, मधुमेह, एचआयव्ही, रक्त विकार यांसारखे आजार आहेत अशा व्यक्तींसाठी फ्लू अधिक जोखमीचे ठरू शकते. त्यांच्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचेही डॉ. बलकी म्हणाले.

-प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी दोन आठवडे

इन्फ्लूएन्झा पासून स्वत:चे आणि आपल्या सभोवतालच्या लोकांचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वार्षिक इन्फ्लूएंझा लस घेणे. लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतात.

-लसीकरणाचे फायदे

:: दमा (अस्थमा) सि.ओ.पी.डी. रुग्णांसाठी लाभदायक

::. वारंवार होणारी सर्दी किंवा फ्लु पासुन संरक्षण

:: वातावरणातील बदलांमुळे होणार् या आजारापासून बचाव

:: स्वाईन फ्लुपासुन संरक्षण

:: जागतिक स्वास्थ संघटनेने प्रमाणीत केलेली ही लस ३ व त्यापुढील वयोगटातील लोकांना देता येते.

-पाच वर्षांखालील बालके इन्फ्लूएंझासाठी असुरक्षित 

पावसाळा सुरू झाला की, दम्याच्या रुग्णांसह लहान मुलांना श्वसनाचे आजार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. पाच वर्षांखालील बालके विशेषत: इन्फ्लूएंझासाठी असुरक्षित असतात. कुटुंबात व समाजात रोगाचा प्रसार रोखण्यासाठी फ्लू लसीकरण आवश्यक मानले जाते.

-डॉ. आकाश बलकी, श्वसनरोग तज्ज्ञ

Web Title: Danger to serious lung patients if infected with influenza! The preventive vaccine is effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य