नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप; अधिकारी झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 09:58 PM2018-10-20T21:58:40+5:302018-10-20T22:00:02+5:30
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक डेंग्यू मुळे मोठया संख्येने मृत्यू झालेले आहेत. यामुळे महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. हजारो रुग्ण सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानाही महापालिका म्हणत आहे २०३ रुग्ण आहेत. एवढेच नव्हे तर डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची पुष्टी मिळालेली नाही. असा हास्यास्पद दावा केला आहे. वास्तविक डेंग्यू मुळे मोठया संख्येने मृत्यू झालेले आहेत. यामुळे महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशी मागणी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांनी शनिवारी सर्वसाधारण सभेत केली.
कावीळ, स्क्रब टायफस प्रकरणातही महापालिकेची भूमिका उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक मनोज सांगोळे यांनी केला. डेंग्यूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. हा दावाच चुकीचा आहे. माजी लेखा परीक्षक महेंद्र सुटे यांच्या मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला. डेंग्यूचा प्रक ोप नसेल तर जे डॉक्टर या आजाराविषयी भिती पसरवत आहेत. त्यांवर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी सांगोळे यांनी केली.
बसपाचे मोहम्मद जमाल म्हणाले, फॉगिंगसाठी प्रभागात मशीन पाठविली जाते. परंतु डिझेल लगेच संपते. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांनीही डेंग्यूचा प्रश्न उपस्थित करून विभागाचा कारभार संशयास्पद असल्याचा आरोप केला. भाजपाचे नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर म्हणाले, पॅथॉलॉजिस्टांच्या संमेलनात सक्करदरा भागात डेंग्यूचा सर्वाधिक प्रकोप असल्याची माहिती देण्यात आली. परंतु महापालिका म्हणते गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अखेर उपहमापौर दीपराज पार्डीकर यांनी आयुक्तांना या प्रक रणात लक्ष घालून चौकशी करण्याचे निर्देश दिले.
थोटे यांची बदली
मलेरिया-फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे यांची वर्धा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांना शासनाने प्रतिनियुक्तीवर महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागात पाठविण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाचे अधिकार महापालिकेला नाही.त्यांना परत बोलवण्याचा प्रस्ताव पाठविता येतो. परंतु त्यांची बदली झाली असल्याने यावरील वाद शांत झाला.