दपूम रेल्वेने केला आठ रेल्वेगाड्यांचा विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:06 AM2021-06-26T04:06:56+5:302021-06-26T04:06:56+5:30
नागपूर : रेल्वे प्रवाशांची सुविधा आणि मागणी पाहून रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचा ...
नागपूर : रेल्वे प्रवाशांची सुविधा आणि मागणी पाहून रेल्वे प्रशासनाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांचा विस्तार केला आहे. त्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२३८९ गया-चेन्नई विशेष रेल्वेगाडी प्रत्येक रविवारी २७ जून २०२१ ऐवजी २९ ऑगस्ट २०२१ पर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२३८० चेन्नई-गया विशेष रेल्वेगाडी प्रत्येक मंगळवारी २९ जून २०२१ ऐवजी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१०१ कुर्ला-हावडा विशेष रेल्वेगाडी २९ जून २०२१ ऐवजी ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत तसेच रेल्वेगाडी क्रमांक ०२१०२ हावडा-कुर्ला विशेष रेल्वेगाडी १ जुलै २०२१ ऐवजी १ नोव्हेंबर २०२१ पर्यंत धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१२ हटिया-कुर्ला विशेष रेल्वेगाडी २६ जून २०२१ ऐवजी २५ सप्टेबर २०२१ पर्यंत आणि रेल्वेगाडी क्रमांक ०२८११ कुर्ला-हटिया विशेष रेल्वेगाडी २८ जून २०२१ ऐवजी २१ सप्टेबर २०२१ पर्यंत धावेल. याशिवाय रेल्वेगाडी क्रमांक ०२८१७ संतरागाछी-पुणे विशेष रेल्वेगाडी २८ जून २०२१ ऐवजी २५ सप्टेबर २०२१ आणि रेल्वेगाडी क्रमांक ०२८१८ पुणे-संतरागाछी विशेष रेल्वेगाडी २८ जून २०२१ ऐवजी २७ सप्टेबर २०२१ पर्यंत धावणार आहे. या रेल्वेगाड्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार असून त्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
..................