माल वाहतुकीद्वारे दपूम रेल्वेला मिळाले ५३.४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:52+5:302021-03-06T04:07:52+5:30

नागपूर : माल वाहतुकीच्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला फेब्रुवारी महिन्यात ५३.४५ कोटी आणि पार्सलद्वारे २७.७६ लाख ...

Dapum Railway gets Rs 53.45 crore through freight | माल वाहतुकीद्वारे दपूम रेल्वेला मिळाले ५३.४५ कोटी

माल वाहतुकीद्वारे दपूम रेल्वेला मिळाले ५३.४५ कोटी

Next

नागपूर : माल वाहतुकीच्या माध्यमातून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला फेब्रुवारी महिन्यात ५३.४५ कोटी आणि पार्सलद्वारे २७.७६ लाख उत्पन्न मिळाले आहे. अधिकाधिक माल वाहतूक व्हावी, यासाठी विभागाच्यावतीने व्यापाऱ्यांशी संपर्क साधून प्रेरित करण्यात येत आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने फेब्रुवारी २०२१ मध्ये २५९ रॅकचा उपयोग करून १२२२९ वॅगनच्या माध्यमातून ०.८१४ मिलीयन टन माल वाहतूक केली. विभागाला त्याद्वारे ५३ कोटी ४५ लाख उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत माल वाहतुकीत ६०.६ टक्के आणि उत्पन्नात ५७.७ टक्के अधिक आहे. विभागाने फेब्रुवारी महिन्यात ११४८ टन पार्सलची लोडींग केली. त्या द्वारे विभागाला २७ लाख ७६ हजार रुपये उत्पन्न मिळाले. माल वाहतुकीत वाढ व्हावी, यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे व्यापाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत असून, त्यांना माल वाहतुकीसाठी प्रेरित करण्यात येत आहे.

........

Web Title: Dapum Railway gets Rs 53.45 crore through freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.