दर्डा संगीत अकादमीने दिले कलावंतांच्या प्रतिभांना पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:57 PM2019-06-20T23:57:22+5:302019-06-20T23:59:44+5:30

शास्त्रीय संगीत हा संगीत कलेचा पाया आहे व त्यातूनच सशक्त कलावंत घडविला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये शास्त्रीय संगीत रुजावे, हा उद्देश ठेवून सुरू झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीने खऱ्या अर्थाने कलावंतांच्या प्रतिभांना पंख दिले आहे.

Darda Music Academy gave wings to artist talent | दर्डा संगीत अकादमीने दिले कलावंतांच्या प्रतिभांना पंख

दर्डा संगीत अकादमीने दिले कलावंतांच्या प्रतिभांना पंख

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय स्पर्धा, टीव्ही शो व पार्श्वगायनात अकादमीच्या विद्यार्थ्यांचा ठसा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शास्त्रीय संगीत हा संगीत कलेचा पाया आहे व त्यातूनच सशक्त कलावंत घडविला जाऊ शकतो. त्यामुळे मुलांमध्ये शास्त्रीय संगीत रुजावे, हा उद्देश ठेवून सुरू झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीने खऱ्या अर्थाने कलावंतांच्या प्रतिभांना पंख दिले आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा ज्योत्स्ना दर्डा या स्वत: संगीत साधक, उत्कृष्ट व्हायोलिन वादक आणि गायक होत्या. शास्त्रीय संगीताचे महत्त्व त्यांना ज्ञात होते. त्यामुळे लहान मुलांनी शास्त्रीय संगीत अभ्यासावे हे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून २००५ साली दर्डा संगीत अकादमीची रुजवात केली होती. तेव्हापासून या अकादमीने उत्तमोत्तम कलावंत घडविले आहेत. दर्डा अकादमी अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे मान्यताप्राप्त केंद्र असून, मंडळाच्या संगीतविषयक सर्व परीक्षा येथे घेतल्या जातात. अकादमीच्या प्रतिभावंत मार्गदर्शिका डॉ. शमा वाखारकर या स्वत: संगीत विशारद असून, बडोद्याहून त्यांनी संगीत विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण आणि सुगम संगीताचे उत्तम मार्गदर्शन हे या अकादमीचे वैशिष्ट्य आहे. डॉ. शमा यांच्या सक्षम मार्गदर्शनात मुलांच्या संगीत कौशल्याला आकार मिळाला आहे. अकादमीच्या अनेक कलावंतांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये क्रमांक प्राप्त केला आहे. अंताक्षरी स्पर्धा तसेच टीव्हीवरील विविध रिअ‍ॅलिटी शोजमध्ये स्वत:च्या प्रतिभेचा ठसा उमटविला आहे. एवढेच नाही तर पार्श्वगायनाच्या क्षेत्रातही अकादमीचे अनेक कलावंत नावरूपास येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिभा घडविणारी ही शहरातील एकमेव अकादमी आहे. त्यामुळे मुलांच्या प्रतिभांना ओळख देणारी संस्था म्हणून दर्डा संगीत अकादमीने स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Darda Music Academy gave wings to artist talent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.