नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 08:27 PM2018-11-12T20:27:08+5:302018-11-12T20:28:36+5:30

बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली.

The daredevil theft in a clothing store in Nagpur's Sitabuldi | नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी

नागपूरच्या अतिवर्दळीच्या सीताबर्डीतील कपड्याच्या दुकानात धाडसी चोरी

googlenewsNext
ठळक मुद्देरोख आणि चांदीची मूर्ती लंपास : सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाथरूमची ग्रील तोडून सीताबर्डीतील एका कपड्याच्या दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानातील २ लाख, १६ हजारांची रोकड तसेच चांदीची मूर्ती चोरून नेली. रविवारी दुपारी ही चोरीची घटना उघडकीस आली.
सतरंजीपुरा इतवारीत राहणारे संकेत मुकेश जैन यांचे सीताबर्डीतील मोदी नंबर दोनमध्ये राजघराणा गारमेंट नावाने कपड्याचे दुकान आहे. दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या भागातून बाथरूमची ग्रील तोडून रविवारी पहाटे २.५८ वाजता चोरटा आतमध्ये शिरला. मौल्यवान चीजवस्तू शोधण्यासाठी त्याने तब्बल तासभर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त केले. त्यानंतर काऊंटरमध्ये ठेवलेली २ लाख, १६ हजार ३५० रुपयांची रोकड आणि चांदीची मूर्ती चोरून चोरटा पळून गेला. रविवारी दुपारी जैन यांनी या चोरीची तक्रार सीताबर्डी पोलिसांकडे नोंदवली. पोलिसांनी दुकानात पोहचून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीत या चोरीचा घटनाक्रम कैद झाला आहे. त्यानुसार, चोरटा एकटाच आतमध्ये आल्याचे दिसते. बाहेर त्याचा एखादा साथीदार पाळतीवर असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दुकानात येणाऱ्या किंवा येऊन गेलेल्या पैकीच कुण्या आरोपीने ही चोरी केली असावी, असाही संशय आहे. या प्रकरणात सीताबर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: The daredevil theft in a clothing store in Nagpur's Sitabuldi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.