दारूकंपनीवर धाड
By admin | Published: March 23, 2016 02:57 AM2016-03-23T02:57:18+5:302016-03-23T02:57:18+5:30
दारूच्या व्यवसायातून विक्री कर विभागाला १७.४९ कोटी रुपयाचा चुना लावल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक
नागपूर : दारूच्या व्यवसायातून विक्री कर विभागाला १७.४९ कोटी रुपयाचा चुना लावल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाने चिंचभवन येथील विदर्भ बॉटलर्सवर धाड टाकली. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित दस्ताऐवज जप्त केले.
सोनेगाव पोलिसांनी २७ फेब्रुवारी रोजी उद्योजक देवीलाल जायस्वालसह सहा दारूविक्रेत्या व्यापाऱ्यांच्या विरोधात १७ कोटी ४९ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दारू कंपनी विदर्भ बॉटलर्स महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा २००२ अंतर्गत नोंदणीकृत आहे. कंपनीतील उत्पादनानुसार सरकारला विक्रीकर अदा करावयाचा होता. परंतु विक्रीकर अदा न केल्याने विक्रीकर विभागाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोनेगाव पोलिसांनी फसवणूक, अपहार आणि महाराष्ट्र मूल्यवर्धित अधिनियम २००२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाच्या तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे सोपविण्यात आला होता. आथिक विभागाचे पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक प्रदीप लांडे यांनी मंगळवारी सकाळी विदर्भ बॉटलर्सवर धाड टाकली. कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज जप्त केले. (प्रतिनिधी)