डाटा अ‍ॅनालिटिक्स’ची भूमिका महत्त्वाची

By admin | Published: February 21, 2017 02:18 AM2017-02-21T02:18:07+5:302017-02-21T02:18:07+5:30

निर्णय प्रक्रियेत ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात.

Data analytics plays an important role | डाटा अ‍ॅनालिटिक्स’ची भूमिका महत्त्वाची

डाटा अ‍ॅनालिटिक्स’ची भूमिका महत्त्वाची

Next

गौतम दास : ‘नीरी’त विशेष कार्यशाळेचे आयोजन
नागपूर : निर्णय प्रक्रियेत ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती, माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण आणि संगणकावर आधारित ‘मॉडेल’ यांना एका सूत्रात जोडून या प्रक्रियेत निर्णय घेता येतो, असे मत ‘इन्सअ‍ॅनालिटिक्स’ कोलकाताचे ‘सीईओ’ गौतम दास यांनी व्यक्त केले. ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’संदर्भात ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
या दोन दिवसीय कार्यशाळेला सोमवारी सुरुवात झाली. ‘नीरी’च्या वातावरण बदल सेलचे प्रमुख व मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, ‘नीरी’चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.सुशील कुमार, डॉ.परिक्षित वर्मा, डॉ.एच.व्ही.सिंग, डॉ.आशीष शर्मा, डॉ.प्रदीप साळवे हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ.दास यांनी ‘डाटा अ‍ॅनालिटिक्स’चे महत्त्व सांगितले. पर्यावरण, घनकचरा व्यवस्थापन, जलतंत्रज्ञान आणि व्यवस्थापन, वायुप्रदूषण नियंत्रण इत्यादीमध्ये याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. वैज्ञानिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. ‘आयआयटी-खडगपूर’, ‘इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ आणि ‘आयआयएम-कोलकाता’ यांनी ‘अ‍ॅनालिटिक्स’मध्ये दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, डॉ.पांडे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना मांडली. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच ‘बिग डाटा’ व ‘सुपरकम्युटिंग’संदर्भातदेखील माहिती देण्यात येईल. ‘केस स्टडी’च्या माध्यमातूनदेखील विविध मुद्यांवर प्रकाश टाकण्यात येईल.(प्रतिनिधी)

Web Title: Data analytics plays an important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.