नागपूरची कन्या प्रीती करणार अमेरिकेत कँसर उपचारावर संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:40 IST2017-11-30T23:28:11+5:302017-11-30T23:40:38+5:30
जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या एका सामान्य मुलीने जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधकांवर आपली छाप सोडली. तिच्या चिकित्सक वृत्तीची दखल घेत परिषदेत उपस्थित संशोधकांनी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात ती कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे.

नागपूरची कन्या प्रीती करणार अमेरिकेत कँसर उपचारावर संशोधन
आॅनलाईन लोकमत
नागपूर : जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर नागपूरच्या एका सामान्य मुलीने जपानच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक स्तरावरील संशोधकांवर आपली छाप सोडली. तिच्या चिकित्सक वृत्तीची दखल घेत परिषदेत उपस्थित संशोधकांनी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात ती कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे. त्यासाठी तिला फेलोशिप मिळाली आहे.
या नागपूरकर मुलीचे नाव डॉ. प्रीती फाटे आहे. प्रीती ही अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगी. तिचे शिक्षण नागपूर विद्यापीठातून झाले. नागपूर विद्यापीठातून एमएस्सी करताना ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. पुढे तिने देशातील सर्वात कठीण सीएसआयआर नेट ही परीक्षा उत्तीर्ण केली व रायगड येथील जेएसएम महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून ती रुजू झाली. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही प्रीती स्वस्थ बसली नाही. तिने ‘मिक्झोमायसिटीज’ या विषयावर संशोधन करून, पीएच.डी. मिळविली. जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत तिच्या संशोधनाची जागतिक स्तरावरील संशोधकांनी प्रशंसा केली. तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ती आता अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठात कॅन्सरवर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करणार आहे.