आज पृथ्वीवर दिवस-रात्र एकसमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 11:52 PM2021-03-19T23:52:17+5:302021-03-19T23:55:09+5:30

Day and night same दरवर्षी हाेणाऱ्या खगाेलीय घटनेप्रमाणे शनिवारी म्हणजे २० मार्च राेजी दिवस आणि रात्र एकसमान म्हणजे त्यांचा कालावधी एकसारखा असणार आहे.

Day and night are the same on earth today | आज पृथ्वीवर दिवस-रात्र एकसमान

आज पृथ्वीवर दिवस-रात्र एकसमान

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यान्हीला सूर्य डाेक्यावर पण ढगांनी अनुभव घेण्यास अडचण

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : दरवर्षी हाेणाऱ्या खगाेलीय घटनेप्रमाणे शनिवारी म्हणजे २० मार्च राेजी दिवस आणि रात्र एकसमान म्हणजे त्यांचा कालावधी एकसारखा असणार आहे. या दिवशी सूर्य बराेबर विषुववृत्तावर पाेहोचत आहे. खगाेलशास्त्रात या दिवसाला ‘विषुवदिन’ (इकाेनाॅक्स) असे संबाेधले जाते. भारतात या दिवसाला ‘वसंतपाद दिन’ असेही म्हटले जाते. दरवर्षी २० ते २२ मार्चदरम्यान हा दिवस येताे.

रमन विज्ञान केंद्राचे खगाेल शिक्षक महेंद्र वाघ यांनी सांगितले, पृथ्वीवर दिवस व रात्र नेहमीच लहान - माेठे असतात. ही असमानता पृथ्वीच्या आसाच्या कलण्यामुळे निर्माण हाेते. मात्र वर्षाला एक दिवशी रात्र व दिवस समान असताे. पृथ्वीच्या परांचल गतीमुळे या दिवसात थाेडा फरक हाेताे म्हणजे हा दिवस पुढे-मागे हाेत असताे. या दिवशी पृथ्वीचे दाेन्ही ध्रुव सूर्यासमाेर असतात. या वेळी विषुववृत्तावर मध्यान्हीच्या वेळी सूर्याची किरणे लंबरूप पडतात. म्हणजे मध्यान्हीच्या वेळी विषुववृत्तावर सूर्य बराेबर डाेक्यावर असताे. आकाशात ढगाळ वातावरण असल्याने कदाचित हा क्षण अनुभवता येणार नाही, अशी शक्यता वाघ यांनी व्यक्त केली. जेव्हा गाेलार्ध सूर्याकडे कललेला नसताे, दाेन्ही गाेलार्ध सूर्यापासून समान अंतरावर असतात, अशा दिवशी संपूर्ण पृथ्वीवर दिवस आणि रात्र समान असतात. खगाेलप्रेमी आणि अवकाशाबाबत जिज्ञासा बाळगणाऱ्यांनी २० मार्च रोजी म्हणजे आज दिवस आणि रात्रीच्या काळाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व दिवस-रात्रीचे कालमापन करावे, असे आवाहन महेंद्र वाघ यांनी केले आहे.

Web Title: Day and night are the same on earth today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी