‘डे-केअर’ वॉर्ड सुरू होणार

By admin | Published: February 10, 2017 02:44 AM2017-02-10T02:44:29+5:302017-02-10T02:44:29+5:30

रक्ताचा आजार समजल्या जाणाऱ्या सिकलसेल, थॅलेसिमियाच्या अनेक रुग्णांवर रक्त बदलण्याची वेळ येते.

Day-Care ward will be started | ‘डे-केअर’ वॉर्ड सुरू होणार

‘डे-केअर’ वॉर्ड सुरू होणार

Next

मेडिकल : सिकलसेल, थॅलेसिमियासह इतरही रुग्णांवर उपचार
नागपूर : रक्ताचा आजार समजल्या जाणाऱ्या सिकलसेल, थॅलेसिमियाच्या अनेक रुग्णांवर रक्त बदलण्याची वेळ येते. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. याशिवाय इतरही आजाराच्या रुग्णांना केवळ दिवसभर उपचार करून परत पाठविणे शक्य असते. मात्र, मेडिकलमध्ये रुग्णांची अफाट गर्दी पाहता हे शक्य होत नव्हते. आता अशा रुग्णांसाठी खास विशेष-डे केअर वॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. या वॉर्डाचे काम पूर्ण झाले असून येत्या मंगळवारपासून हा नवा वॉर्ड रुग्णसेवेत असेल. रुग्णांच्या सोयीसाठी रुग्णालय प्रशासनाने उचलले हे पाऊल रुग्णाना दिलसा देणारे आहे.
गरिबांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे अडीच हजारावर रुग्ण येतात. यातील सुमारे दोनशेवर रुग्णांना रुग्णालयात भरती केले जातात. यातील काही रुग्णांवर एक दिवसाच्या उपचाराची गरज असते. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही तातडीने उपचार मिळून रुग्णालयातून सुटी मिळण्याची अपेक्षा असते. दुसरीकडे, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे दूरू न उपचारासाठी आलेल्या गरीब रुग्णांना अडचणीचे जाते. विशेषत: सिकलसेल किंवा थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्त देऊन त्याच दिवशी सुटी देणे शक्य आहे. अशाच प्रकारच्या इतरही आजाराच्या रुग्णांचे आहे. परंतु रुग्णांच्या गर्दीमुळे हे शक्य होत नव्हते. याची दखल मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतली. त्यांनी अशा रुग्णांसाठी ‘डे-केअर’ वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला.(प्रतिनिधी)

‘डे-केअर’वॉर्डाचा लाभ सर्वच रुग्णांसाठी
‘डे-केअर’ वॉर्डमध्ये सिकलसेल, थॅलेसिमियासोबतच इतरही आजाराचे रुग्ण ठेवले जातील. सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हा वॉर्ड सुरू असेल. जसजसे रुग्णांवर उपचार झाले त्यांना घरी पाठविण्यात येईल. दिवसभर उपचार करूनही ज्यांनी आणखी उपचाराची गरज आहे, अशा रुग्णांना संबंधित विभागाच्या वॉर्डात पाठविले जाईल. या रुग्णाच्या सेवेत त्या-त्या विभागाचे वरिष्ठ डॉक्टरांसोबतच निवासी डॉक्टर असणार आहेत. वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या जागेवर रुग्ण दिसेल अशी सीसीटीव्हीची व्यवस्था केली जाईल.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Day-Care ward will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.