दयाशंकर तिवारी सत्तापक्षनेते

By Admin | Published: January 8, 2015 01:24 AM2015-01-08T01:24:14+5:302015-01-08T01:24:14+5:30

महापालिकेतील नागपूर शहर विकास आघाडीचे सभागृह नेते म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

Dayashankar Tiwari, the ruling party's candidate | दयाशंकर तिवारी सत्तापक्षनेते

दयाशंकर तिवारी सत्तापक्षनेते

googlenewsNext

महापौरांनी केली घोषणा : विभागीय आयुक्तांना पत्र देणार
नागपूर : महापालिकेतील नागपूर शहर विकास आघाडीचे सभागृह नेते म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
भाजपच्या पार्लमेंन्ट्री बोर्डाच्या बैठकीत तिवारी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार कृ ष्णा खोपडे यांनी या संदर्भात महापौरांना पत्र दिले आहे.
तिवारी यांनी यापूर्वी २००१ मध्ये सत्तापक्ष नेतेपदाची जबादारी सांभाळली आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आम्हाला लाभ होईल गुरुवारी मी सत्तापक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ न तिवारी यांची निवड करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सभापती गिरीश देशमुख आदी उपस्थित होते. चार महिन्यापूर्वी दटके यांची महापौरपदी निवड झाल्यापासून सत्तापक्ष नेतेपद रिक्त होते. (प्रतिनिधी)
विकासाची कामे तातडीने मार्गी लावू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहर विकासाचा संकल्प केला असून यासाठी निधी आणला आहे. यातून शहरातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया दयाशंकर तिवारी यांनी ‘लोकमत‘शी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Dayashankar Tiwari, the ruling party's candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.