डीबीए निवडणूक : अध्यक्षपदी कमल सतुजा, सचिवपदी नितीन देशमुख विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:14 PM2018-10-27T22:14:03+5:302018-10-27T22:16:55+5:30
जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीत कमल सतुजा तर, सचिवपदाच्या लढतीत नितीन देशमुख यांनी विजय मिळविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीत कमल सतुजा तर, सचिवपदाच्या लढतीत नितीन देशमुख यांनी विजय मिळविला.
अध्यक्षपदासाठी सतुजा, उदय डबले व माजी सचिव मनोज साबळे रिंगणात होते. निवडणुकीपूर्वी तिघांचीही बाजू भक्कम दिसून येत होती. त्यांनी मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी आपापल्यापरीने जोर लावला होता. शेवटी मतदारांनी सतुजा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सचिवपदासाठी देशमुख व विवेक कोलते यांच्यात मुख्य लढत झाली. त्यात देशमुख यांनी २५ मतांनी बाजी मारली. कार्यकारी मंडळातील १७ जागांसाठी ६८ उमेदवार रिंगणात होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ दोन वर्षे म्हणजे, २०१८ ते २०२० पर्यंत कार्यरत राहील.
असे झाले मतदान
अध्यक्ष : कमल सतुजा - १४७८ (विजयी), उदय डबले - १२०३, मनोज साबळे - ६२९ .
सचिव : नितीन देशमुख - ९२९ (विजयी), विवेक कोलते - ९०४, रंजन देशपांडे - ६८०, सुशील कल्याणी - ४०९, मंगेश मून - ३१५.
उपाध्यक्ष (दोन जागा) - शशांक चौबे - १०१८, विवेक कराडे - ९२२ (विजयी), मनीष गुप्ता - ८४०, तावीर शेख - ६९६, पराग बेझलवार -६६७, सौमित्र पाल - ४५३, विलास राऊत - ३६५, विलास सेलोकर - ३६०, सुनील लाचरवार - २६३, प्रभाकर भुरे - २४४, छायादेवी यादव - २२५.
सहसचिव (दोन जागा) - मीनाक्षी माहेश्वरी - १०४९, पराग वाघ - १००० (विजयी), उमाकांत सोनकुसरे - ८२५, कैलाश वाघमारे - ८१५, पंकज तपासे - ७८४, आशिष भेंडारकर - ६५५, शीतल शुक्ला - ४१५, मो. सज्जथ बेग - ३३२, शैलेश जयस्वाल - २८१.
कोषाध्यक्ष : अनिल गुल्हाने - १६४५ (विजयी), नितीन गांधी - ८८४, तरुण परमार - ५१६.
ग्रंथालय प्रभारी : कीर्तिकुमार कडू - १५०१ (विजयी), विक्की तांबे - ६१७, शरद पनपालिया - ४३८, नीतेश समुंद्रे - ३५४, मंगला वारके - ३००.
कार्यकारी सदस्य (नऊ जागा) : मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.