डीसीएफ शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर ठाेकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:25+5:302021-03-27T04:07:25+5:30

नागपर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कार्यरत हरिसाल वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात नागपूर लाेहमार्ग पाेलीस व अमरावती ...

DCF Shivkumar was handcuffed at Nagpur railway station | डीसीएफ शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर ठाेकल्या बेड्या

डीसीएफ शिवकुमारला नागपूर रेल्वे स्थानकावर ठाेकल्या बेड्या

Next

नागपर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कार्यरत हरिसाल वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात नागपूर लाेहमार्ग पाेलीस व अमरावती पाेलिसांनी माेठी कारवाई केली. चव्हाण यांच्या सुसाईड नाेटनुसार आत्महत्येस जबाबदार असलेल्या उपवनसंरक्षक विनाेद शिवकुमार याला शुक्रवारी नागपूर रेल्वे स्थानकावर बेड्या ठाेकण्यात आल्या. प्रकरण समाेर आल्यानंतर शिवकुमार त्याच्या बंगळुरूजवळील गावी पळून जात हाेता.

आरएफओ दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी त्यांच्या हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी गाेळ्या झाडून आत्महत्या केली हाेती. दरम्यान, त्यांच्या घरून अमरावती पाेलिसांना सुसाईड नाेट सापडली हाेती. त्यात त्यांनी डीसीएफ शिवकुमार यांच्याकडून हाेणाऱ्या छळामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे व मृत्यूसाठी शिवकुमार जबाबदार असल्याचे नमूद केले हाेते. धक्कादायक म्हणजे दीपाली यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले तेव्हा त्या गराेदर असल्याचीही माहिती समाेर येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे वनविभागात माेठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, विनाेद शिवकुमार हा बंगळुरूला पळून जात असल्याची माहिती अमरावती पाेलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली. अमरावती पोलीसही सकाळी ९ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. अमरावतीचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, त्यांची चमू आणि लोहमार्ग पोलीस योगेश घुरडे, पप्पू मिश्रा, प्रवीण खवसे यांनी मिळून विनोद शिवकुमारचा शोध सुरू केला. तो रेल्वेगाडी ०२२९६ दिल्ली बंगळुरू एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या तयारीत असताना ९.३० वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर अमरावती पोलीस त्याला अमरावतीला घेऊन गेले.

काेण आहे विनाेद शिवकुमार

विनाेद शिवकुमार हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभाग, धारणी येथे उपवनसंरक्षक आहे. ही त्याची पहिलीच पाेस्टिंग असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्याविराेधात इतरही कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असल्याचे सांगितले जात आहे. सुसाईड नाेटनुसार शिवकुमारने लैंगिक शाेषण करण्याचा प्रयत्न केला आणि विराेध केला असता शारीरिक व मानसिक त्रास दिला. गराेदर असताना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा घृणास्पद प्रकार केल्याचे नमूद आहे.

पीसीसीएफ रेड्डी यांच्यावरही कारवाईची मागणी

दरम्यान, शिवकुमारला अटक झाल्यानंतरही कुटुंबीय व विभागातील कर्मचाऱ्यांमधील असंताेष कमी हाेताना दिसत नाही. दीपाली यांच्या आईसह कुटुंबीयांनी अमरावती येथे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरही कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे फाॅरेस्ट रेंजर्स असाेसिएशन, महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स असाेसिएशन नागपूर, महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवकुमारचे तात्काळ निलंबन व पीसीसीएफ रेड्डी यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: DCF Shivkumar was handcuffed at Nagpur railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.