पाचपावली येथे डीसीएचसी सुरू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:08 AM2021-04-02T04:08:13+5:302021-04-02T04:08:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने गुरुवारी पाचपावली येथील ...

DCHC starts at Pachpawli () | पाचपावली येथे डीसीएचसी सुरू ()

पाचपावली येथे डीसीएचसी सुरू ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेने गुरुवारी पाचपावली येथील कोविड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) सुरू केले. येथे ७० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील कोरोना रुग्ण स्थिर झाल्यानंतर इथे स्थानांतरित करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी येथे ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ११०, आयुष येथे ४०, आयसोलेशन येथे ३२ कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांना स्थिर झाल्यानंतर येथे स्थानांतरित करण्यात येईल, अशी माहिती राम जोशी यांनी दिली.

डॉ. सिद्दीकी यांचे मेडिकल सर्व्हिसेस सोसायटीचे सहकार्य या केंद्रात मिळत आहे. मनपातर्फे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्सेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी रेमेडीसीवर इंजेक्शन घेण्यासाठी येणाऱ्या कोविड रुग्णांसाठीसुद्धा खाटांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी सिंग उपस्थित होते.

Web Title: DCHC starts at Pachpawli ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.