१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 10:29 PM2023-09-23T22:29:27+5:302023-09-23T22:29:52+5:30

Nagpur Flood: नागपुरातील पूरस्थितीचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी आढावा घेतला.

dcm devendra fadnavis and union minister nitin gadkari take review meeting of nagpur flood situation and announced aid | १० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा

१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा

googlenewsNext

Nagpur Flood: शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरात पूर परिस्थती निर्माण झाली. चार तासात १०० मि.मी. हून अधिक पाऊस कोसळल्याने ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली. अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नागनदी, पिवळी नदीला पूर आला. पुराचे पाणी सखल भागांतील झोपडपट्टींसह पॉश वस्त्यांमध्येही शिरले. नागरिकांना जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागली. नागपुरातील या परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुरातील नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. 

नागपुरातील पूरस्थितीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यानंतर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात कमी वेळत १०९ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली. त्यातील ९० टक्के पाऊस हा फक्त दोन तासांत पडला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला आणि पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. यात तीन लोकांचा आणि १० जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले

नागनदीच्या भिंती पडल्याने नुकसान झाले आहे. लोकांच्या घरात पाणी गेल्यानं गाळ आणि चिखलाची परिस्थिती झाली आहे. अनेक लोकांना स्थलांतरीत केले असून, जवळपास १० हजार घरांमध्ये पाणी शिरले आहे. झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाळ घरांमध्ये गेल्याने लोकांना अन्नधान्य फेकून द्यावे लागले आहे. घरात पाणी शिरलेल्यांना १० हजारांची मदत तातडीनं देण्यात येणार आहे. तर, दुकानांना ५० हजार आणि हातगाडीवाल्यांनाही १० हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. महापालिका गाळ काढण्यास मदत करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, चिंतेची बाब एवढीच की रात्री ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एनडीआरफ, एसडीआरफ आणि लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. सगळ्या परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल, तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


 

Web Title: dcm devendra fadnavis and union minister nitin gadkari take review meeting of nagpur flood situation and announced aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.