लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’;दुकाने बंद असूनही विक्री जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:37+5:302021-05-23T04:06:37+5:30

मोरेश्वर मानापुरे नागपूर : गेल्या वर्षभरात काही महिने सोडले तर बाजारपेठ बंदच होती. असे असतानाही दारूविक्री वाढली आहे. याशिवाय ...

'De Daru' in lockdown too; sales are high despite shops closed | लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’;दुकाने बंद असूनही विक्री जोरात!

लॉकडाऊनमध्येही ‘दे दारू’;दुकाने बंद असूनही विक्री जोरात!

Next

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : गेल्या वर्षभरात काही महिने सोडले तर बाजारपेठ बंदच होती. असे असतानाही दारूविक्री वाढली आहे. याशिवाय विभागाने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये दिलेले ५०० कोटी महसूल वसुलीचे लक्ष्य पूर्ण करून ५०८ कोटींचा महसूल गोळा केला. तसेच अवैध धडक मोहीम राबवून गेल्यावर्षी २४४४ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात ४ कोटी ४२ लाख ३२ हजार ६२० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.

कोरोना महामारीमुळे सध्या दारू दुकाने आणि बारमधून पार्सल सेवा सुरू आहे. त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांनाच दारूची विक्री घरपोच करण्यात येत आहे. दुकान वा बारमधून थेट दारूची विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात येत आहे. अवैध विक्रेत्यांवर विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात येते. आतापर्यंत जवळपास ४० जणांवर कारवाई केली आहे. नागपूर जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी अवैध दारू विक्रीवर लक्ष ठेवून आहेत. दुकान वा बारमधून थेट ग्राहकाला विक्री होत असल्यास मालकावर कारवाई करण्यात येत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्याने दारू विक्री आणि महसूल गोळा होण्यावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर विक्री आणि महसुलात वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोन वर्षांत ८.२० कोटी लीटर दारू रिचवली

२०१९-२० ४,३५,१४,८८५ लीटर

२०२०-२१ ३,८५,१९,२३९ लीटर

वर्ष २०१९-२० (विक्री लीटर)

देशी - ३,०२,२०,०७६

विदेशी - १,३२,९४,८०९

बीअर - ९८,५३,४६५

वर्ष २०२०-२१ (विक्री लीटर)

देशी - २,६२,३२,८३१

विदेशी - १,२२,८६,४०८१

बीअर - ६१,७१,४७३

बिअर व विदेशीची विक्री घटली, देशीची वाढली

- वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षात देशी, विदेशी आणि बिअर विक्रीची आकडेवारी पाहिल्यास दोन्ही वर्षांत देशी दारूची विक्री वाढली आणि विदेशी दारू व बिअरची विक्री घटली आहे.

- वर्ष २०१९-२० मध्ये बिअरच्या तुलनेत देशीची २ कोटी ३ लाख ६६ हजार ६११ लिटर जास्त विक्री झाली, तर विदेशीच्या तुलनेत १ कोटी ६९ लाख २५ हजार २६७ लीटर देशी दारू जास्त विकल्या गेली.

- वर्ष २०२०-२१ मध्ये बिअरच्या तुलनेत देशीची २ कोटी ६१ हजार ३५८ लीटर जास्त विक्री झाली, तर विदेशीच्या तुलनेत १ कोटी ३९ लाख ४६ हजार ४२३ लीटर देशी दारू जास्त विकल्या गेली.

महसुलाला दारूचा आधार!

- आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये नागपूर जिल्ह्याला ५९१ कोटी ८३ लाख रुपयांचे लक्ष्य होते. वर्षभरात नागपूर जिल्ह्यात ५२६ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल गोळा झाला. या वर्षात निर्धारित लक्ष्य पूर्ण झाले नाही.

- आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये विभागाने नागपूर जिल्ह्याला ५०० कोटींचे लक्ष्य दिले होते. नागपूर जिल्ह्याने ५०८ कोटी १ लाख रुपयांचा महसूल गोळा करून लक्ष्य पूर्ण केले.

- गेल्यावर्षी कोरोनामुळे राज्य शासनाने त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा कमी लक्ष्य दिले होते. ते नागपूर जिल्ह्याने पूर्ण केले.

दोन वर्षांत ८.४८ कोटींची अवैध दारू जप्त;

४९९० जणांवर कारवाई

- वर्ष २०१९-२० मध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण २७३४ गुन्ह्यांची नोंद, वारस २२५९, बेवारस ४७५ आणि २५४६ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात ४ कोटी ६ लाख २५,९५६ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.

- वर्ष २०२०-२१ मध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण २९३६ गुन्ह्यांची नोंद, वारस २३३०, बेवारस ६०६ आणि २४४४ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात ४ कोटी ४२ लाख ३२ हजार ६२० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

नागपूर जिल्ह्यात दोन वर्षात ८ कोटी ४८ लाख रुपये किमतीची अवैध दारू जप्त केली. नागपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांवर एकत्रित कारवाई केल्याने अवैध दारू विक्रीला आळा बसला आहे. याशिवाय विभागाने दिलेले ५०० कोटींच्या महसुलाच्या लक्ष्यापेक्षा ८ कोटींचा महसूल जास्त अर्थात ५०८ कोटींचा महसूल मिळाला. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा विक्री कमी झाली.

प्रमोद सोनाने, अधीक्षक, नागपूर जिल्हा, उत्पादन शुल्क विभाग

Web Title: 'De Daru' in lockdown too; sales are high despite shops closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.