मृत कोरोना रुग्णावर रहिवासी घाटावरच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 07:47 PM2020-08-20T19:47:25+5:302020-08-20T19:49:00+5:30

यापुढे कोरोना रुग्ण मृत झाल्यास तो राहत असलेल्या परिसरातील दहन घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

Dead Corona patient cremated at residential ghat: Collector's order issued | मृत कोरोना रुग्णावर रहिवासी घाटावरच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

मृत कोरोना रुग्णावर रहिवासी घाटावरच अंत्यसंस्कार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Next
ठळक मुद्देकुणी विरोध केल्यास होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यापुढे कोरोना रुग्ण मृत झाल्यास तो राहत असलेल्या परिसरातील दहन घाटावरच त्याचे अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. कोणतीही व्यक्ती किंवा दहन घाटाचे प्रभारी अधिकारी अंत्यसंस्कारास अडथळा करणार नाहीत. शासनद्वारे निर्गमित एसओपीचे पालन करणे आवश्यक राहील. अशा कामात कुणी बाधा आणल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता अ नुसार कार्यवाहीस पात्र राहतील, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच शासन निर्देशानुसार त्यांना होम आयसोलेशन सुरू करण्यात आले आहे. काही बाबतीत अशा रुग्णांच्या मृत्यू होतो. काही क्षेत्रात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींची अंत्यसंस्कार करण्याबाबत स्थानिक नागरिकांचा विरोध असतो, त्यामुळे मृत व्यक्तींच्या परिजनांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी नेणे भाग पडते अशा ठिकाणीसुध्दा कधी कधी लोकांचा विरोध होतो. अशा परिस्थितीत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नाहक शारीरिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागते. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्काराबाबत नियमित दहनघाटावर दहन करण्याचे विरुध्द कुठलेही निर्देश नसताना गैरसमजुतीमुळे लोकांकडून विरोध होतो. याकरिता लोकांमध्ये जागरुकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Dead Corona patient cremated at residential ghat: Collector's order issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.