विशेष गौरव पुरस्कारांसाठी २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:10 AM2021-09-15T04:10:44+5:302021-09-15T04:10:44+5:30
नागपूर : माजी सैनिक, माजी सैनिक विधवेच्या गुणवंत पाल्यांकडून जिल्हा सैनिक कार्यालयाने विशेष गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले ...
नागपूर : माजी सैनिक, माजी सैनिक विधवेच्या गुणवंत पाल्यांकडून जिल्हा सैनिक कार्यालयाने विशेष गौरव पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. या पुरस्कारांसाठी २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी दिली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेले तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना २५ हजार रुपयांच्या विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांनादेखील सन्मानित करण्यात येणार आहे. आपत्तीच्या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश व राज्याची प्रतिष्ठा वाढविणारे कार्य करणारे माजी सैनिक, विधवा पत्नी, पाल्यांना राष्ट्रीय स्तरासाठी १० हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी २५ हजारांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.