नागपुरात दोन पिस्तुलासह घातक शस्त्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:40 IST2019-09-23T22:39:51+5:302019-09-23T22:40:40+5:30

रविवारी रात्री मानकापूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या एका टोळीला पकडून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल (कट्टा) तसेच चाकूसह अन्य घातक वस्तू जप्त केल्या.

Deadly weapon with two pistols seized in Nagpur | नागपुरात दोन पिस्तुलासह घातक शस्त्र जप्त

नागपुरात दोन पिस्तुलासह घातक शस्त्र जप्त

ठळक मुद्देगुन्हेगारांची टोळी जेरबंद : मानकापूर पोलिसांची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी रात्री मानकापूर पोलिसांनी गुन्हेगारांच्या एका टोळीला पकडून त्यांच्याकडून दोन देशी पिस्तूल (कट्टा) तसेच चाकूसह अन्य घातक वस्तू जप्त केल्या.
वसीम खान ऊर्फ भोजराज तिजाऊ सरपा (वय १९, रा. भैसरा, डोंगरगड), वैभव सतीश दुबे (वय २२, रा. कोराडी), सिमोन सोनू गॅब्रिएल (वय १९, रा. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) त्यांच्या साथीदारासह मानकापूरच्या रेल्वे पुलाजवळ (इंदिरा मातानगर) रविवारी रात्री गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मानकापूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे छापा घातला. पळून जाण्याच्या तयारीत असताना उपरोक्त तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. सिमोन नेल्सन, ओम लल्ला, निलेश ऊर्फ लंगडी (रा. सर्व शंभूनगर, कोराडी) हे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी दोन देशी पिस्तूल, चाकू आणि अ‍ॅक्टीव्हा जप्त केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायणराव शेंडे यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन पिस्तूल घेऊन आरोपी कोणता गुन्हा करणार होते, ते पिस्तूल तस्करी करतात काय, त्याचा मानकापूर पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Deadly weapon with two pistols seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.