नागपुरातील  प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:08 PM2018-07-23T23:08:27+5:302018-07-23T23:09:43+5:30

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनू राजू नायर (वय २५, रा. सदर) याचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय किशोर कनोजिया (वय २३, रा. मुस्लीम लायब्ररीजवळ, सदर) याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून अंकिश ऊर्फ गुलाम संजय दुर्गे (वय २४, रा. मरियमनगर) आणि डॉम्निक ऊर्फ सॅव्हिओ अब्राहम (वय २१, रा. सदर) या दोघांना अटक केली.

Deadly wounded death in Nagpur | नागपुरातील  प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

नागपुरातील  प्राणघातक हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देहत्येचा गुन्हा दाखल : आरोपी गजाआड


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोनू राजू नायर (वय २५, रा. सदर) याचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय किशोर कनोजिया (वय २३, रा. मुस्लीम लायब्ररीजवळ, सदर) याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करून अंकिश ऊर्फ गुलाम संजय दुर्गे (वय २४, रा. मरियमनगर) आणि डॉम्निक ऊर्फ सॅव्हिओ अब्राहम (वय २१, रा. सदर) या दोघांना अटक केली.
मोनू आणि कनोजिया चांगले मित्र होते. कनोजियासोबत आरोपी अंकिश आणि डॉम्निकचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांनी एकमेकांवर हल्ले करून पाहून घेण्याची धमकीही दिली होती. काही दिवसांपूर्वी कनोजियाने साथीदारांसह अंकिश आणि डॉम्निकवर हल्ला करून त्यांची धुलाई केली होती. तेव्हापासून कनोजियाचा गेम करण्यासाठी आरोपी संधी शोधत होते. रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास सेमिनरी हिल्सच्या वाय पॉर्इंट परिसरात कनोजिया फोटो शुटींग करीत असल्याचे कळताच आरोपी अंकिश आणि डॉम्निक तेथे पोहचले. त्यांनी कनोजियावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी धावलेल्या मोनूवरही घातक शस्त्राचे घाव घालून आरोपी पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कनोजियावर उपचार सुरू आहेत.
नाहक गेला बळी
आरोपी अंकिश आणि डॉम्निक हे दोघे कनोजियाचा गेम करण्यासाठी आले होते. त्याच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून मोनू मदतीला धावला. त्यामुळे आरोपींनी कनोजियासोबतच मोनूवरही घाव घातले. यावेळी मोनूचा एक नातेवाईक असहायपणे हे सर्व बघत होता. दरम्यान, मोनूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Deadly wounded death in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.