एकाच भूखंडाचा दौघांशी सौदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:30 AM2020-11-22T09:30:06+5:302020-11-22T09:30:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एकाच भूखंडाचा दौघांशी सौदा करून एका व्यक्तीचे २६ लाख रुपये हडपणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एकाच भूखंडाचा दौघांशी सौदा करून एका व्यक्तीचे २६ लाख रुपये हडपणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मनोज मोतीराम डोर्लीकर (वय ३४) आणि पंकजा मनोहर हरडे (वय३८) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संगनमत करून नंदनवनमधील रमणा मारोती मौजा हरपूर येथील चंद्रभागा सोसायटीत असलेल्या २२ आणि २३ क्रमांकाच्या भूखंडाचा सौदा पालांदूरकर यांच्यासोबत केला. दुसरीकडे नागसेन महादेव डोंगरे (वय ४३, रा. गरोबा मैदान) यांच्याशी ५ नोव्हेंबर २०१९ ला याच भूखंडाच्या विक्रीचा करारनामा करून त्यांच्याकडून २ं६ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर डोंगरे यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी मनोज डोर्लीकर आणि पंकजा हरडे या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींची चौकशी सुरू आहे.
----