Dear चंद्रयान, यु कॅन डू पार्किंग एनिव्हेअर यु लाईक; चंद्रयानचे वर नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्वीट

By योगेश पांडे | Published: August 23, 2023 08:38 PM2023-08-23T20:38:42+5:302023-08-23T20:38:57+5:30

सुरक्षित लॅंडिंगसाठी शुभेच्छा असे हे ट्वीट होते. यावर नेटीझन्सनेदेखील एकाहून एक जोरदार कमेंट्स दिल्या

Dear Chandrayaan, You can do parking anywhere you like; Chandrayaan's groom Nagpur police's bizarre tweet | Dear चंद्रयान, यु कॅन डू पार्किंग एनिव्हेअर यु लाईक; चंद्रयानचे वर नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्वीट

Dear चंद्रयान, यु कॅन डू पार्किंग एनिव्हेअर यु लाईक; चंद्रयानचे वर नागपूर पोलिसांचे भन्नाट ट्वीट

googlenewsNext

नागपूर : चंद्रयान-३ चे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅडिंग झाल्यानंतर सोशल माध्यमांवर विविध प्रतिक्रिया व मीम्सचा पाऊस पडला. मात्र यात नागपूर पोलिसांनी केलेले ट्वीट विशेष चर्चेचा विषय ठरले. नागपूर पोलिसांनी वाहतूकीच्या नियमांशी जोडत भन्नाट ट्वीट केले. ‘चंद्रयान, यु कॅन डू पार्किंग एनिव्हेअर यु लाईक’ या शब्दांत पोलिसांनी या मोहीमेवर भाष्य केले.

नागपूर पोलिसांकडून चंद्रयान-३ च्या लॅडिंगच्या अगोदरच हे ट्वीट करण्यात आले. ‘डिअर चंद्रयान, तुला वाटेल तेथे तू पार्किंग करू शकतोस. आम्ही कुठल्याही टोईंग वाहनाला अजिबात पाठविणार नाही. सुरक्षित लॅंडिंगसाठी शुभेच्छा असे हे ट्वीट होते. यावर नेटीझन्सनेदेखील एकाहून एक जोरदार कमेंट्स दिल्या. चंद्रयान-२ ची मोहीम अयशस्वी ठरल्यावरदेखील नागपूर पोलिसांनी ट्वीट केले होते. त्यात ‘डिअर विक्रम, कृपया उत्तर दे. आम्ही सिग्नल तोडल्याबाबत तुला चलान करणार नाही, असे ते ट्वीट होते.

Web Title: Dear Chandrayaan, You can do parking anywhere you like; Chandrayaan's groom Nagpur police's bizarre tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.