नागपुरात ढोलताशा पथकातील कलावंताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:26 AM2018-06-16T01:26:01+5:302018-06-16T01:26:15+5:30
गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी रात्री सराव करीत असताना ढोलताशा पथकातील एका वादक कलावंताचा आकस्मिक मृत्यू झाला. विक्की प्रकाश मौंदेकर (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बिनाकी शांतिनगरातील तुकडोजी हॉलजवळ राहत होता.
विक्की हा शिव साम्राज्य ढोलताशा पथकातील वादक कलावंत होता. तो पथकाची प्रॅक्टीस करण्यासाठी यशवंत स्टेडियमला गुरुवारी रात्री आला होता. रात्री ८.४५ वाजता ढोल वाजवताना अचानक त्याची प्रकृती खालावली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी धंतोलीतील खासगी इस्पितळात नेले. मात्र रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी विक्कीला मृत घोषित केले. प्रकाश चुडामन मौंदेकर (वय ५५) यांनी दिलेल्या सूचनेवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.