विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:47+5:302021-05-16T04:08:47+5:30
कुही : वादळामुळे तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील आकाेली शिवारात ...
कुही : वादळामुळे तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील आकाेली शिवारात शनिवारी (दि. १५) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
आकाेली परिसराला शुक्रवारी (दि. १४) दुपारी वादळ व अवकाळी पावसाचा फटका बसला. या वादळामुळे या भागातील विजेचे खांब उन्मळून पडल्याने व वाकल्याने विजेच्या तारा तुटल्या. मात्र, यातील काही तारांमधील वीजप्रवाह खंडित करण्यात आला नव्हता. दरम्यान, शनिवारी दुपारी सुधीर बाबूराव कानतोडे, रा. आकोली यांच्या मालकीची म्हैस शेतात चारा खात असताना तिचा विजेच्या तुटून पडलेल्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि तिला जाेरात विजेेचा धक्का लागला. यात त्या म्हशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुधीर कानताेडे शेतीसाेबतच दुधाचाही जाेडधंदा करतात. म्हशीचा मृत्यू झाल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत महावितरण कंपनी, पाेलीस, पशुसंवर्धन अधिकारी व तलाठ्याला माहिती दिल्याचेही सुधीर कानताेडे यांनी सांगितले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून महावितरण कंपनीने त्या मृत म्हशीची शेतकऱ्याला याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच गजानन धांडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.