लसीकरण झालेल्या भंडारा येथील चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:57 PM2018-12-11T22:57:10+5:302018-12-11T22:58:24+5:30

गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लसीकरणामुळे अत्यवस्थ झालेल्या दोन मुलापैकी १० वर्षीय मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तर एक मुलगा भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Death of a child from Bhandara due to vaccination | लसीकरण झालेल्या भंडारा येथील चिमुकलीचा मृत्यू

लसीकरण झालेल्या भंडारा येथील चिमुकलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देशवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा : गोवर-रुबेला लसीकरणाचा रुग्ण मेडिकलमध्ये दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. यामुळेच या मोहिमेला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. मात्र भंडारा येथील ११ महिन्याच्या चिमुकलीचा लस दिल्यानंतर दोन दिवसात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. लसीमुळे तिचा मृत्यू झाला नसावा असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे, परंतु सर्वांनाच शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. लसीकरणामुळे अत्यवस्थ झालेल्या दोन मुलापैकी १० वर्षीय मुलीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले तर एक मुलगा भंडारा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आराध्या वाघाये (११ महिने) रा. भंडारा असे मृताचे नाव आहे.
विविध आजारांपासून बालकांचा बचाव व्हावा यासाठी राज्य शासनाने ‘रुबेला-गोवर’ लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबरपासून हाती घेतली आहे. ९ महिने ते १५ वर्षवयोगटातील मुलांना लस दिली जात आहे. राज्यातील एकही बालक लसीकरणातून सुटू नये यासाठी राज्य शासनाने प्रत्येक विभागाला उद्दिष्ट दिले आहे. ८ डिसेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ३०३ बालकांना लस देण्यात आली आहे तर विभागात नागपूरसह, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे मिळून १३ लाख ५ हजार ११२ मुलांना लस देण्यात आली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. एका लसीमुळे घातक असलेला गोवर व रुबेला रोगावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे, यामुळे लसीकरणासाठी पालकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. या दरम्यान विविध अफवा पसरल्या तरी त्याचा फारसा प्रभाव या मोहिमेवर पडलेला नाही. आराध्याचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचे अधिकारी सांगत असून शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे, त्यांचे म्हणणे आहे.
प्राप्त माहितीनुसार, आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. ६ तारखेला तिची प्रकृती खालवली. यामुळे तिला ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून दुपारी १२ वाजता भंडारा सामान्य रुग्णालयात दुपारी २.३० वाजता नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती केले. ७ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान आराध्याचा मृत्यू झाला. या घटनेला चार दिवस होत नाही तोच लसीकरण झालेल्या १० वर्षीय मुलीला मेडिकलच्या बालरोग विभागात तर एका मुलाला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लसीकरण सूरक्षीतच
आराध्याचा मृत्यू नंतर मेडिकलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. हा अहवाल येईपर्यंत काही बोलणे योग्य होणार नाही. गोवर-रुबेला लसीकरण सुरक्षित आहे. पालकांनी कुठलीही भीती बाळगू नये.
डॉ. एस. उके
जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा

 

Web Title: Death of a child from Bhandara due to vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.