विदर्भात दोन महिन्यानंतर मृत्यूसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:10 PM2020-10-10T21:10:46+5:302020-10-10T21:12:22+5:30
Death by Corona Virus decline, Vidarbha News विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी ३१ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर मृतांची संख्या ३१ वर आली आहे. आज १,२५२ रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १,६६,४७४ झाली असून मृतांची संख्या ४,४७८ पोहचली आहे.
नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय मृतांचे आकडेही कमी होऊ लागले आहेत. शनिवारी ६२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज १२६ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा बळी गेला. रुग्णसंख्या ११,८९० तर मृतांची संख्या १८१ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४,८२५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या ३२७ वर गेली. भंडारा जिल्ह्यात ९५ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ६,६८५ तर मृतांची संख्या १५९ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६३ रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुलडााणा जिल्ह्यात ५६ रुग्ण व एकाचा बळी गेला. वाशिम जिल्ह्यात ३१ रुग्णांची भर पडली. वर्धा जिल्ह्यात ७४ रुग्ण पाच रुग्णांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात ३७ रुग्णांची नोंद झाली.