जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:02+5:302021-03-21T04:09:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार/हिवराबाजार : घरासमाेर टाकलेल्या गिट्टीच्या ढिगावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि दाेन्ही भावांनी त्यांच्याच सख्ख्या बहिणीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार/हिवराबाजार : घरासमाेर टाकलेल्या गिट्टीच्या ढिगावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि दाेन्ही भावांनी त्यांच्याच सख्ख्या बहिणीच्या पतीच्या डाेक्यावर सब्बलने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. १२ मार्च) रात्री देवलापार (ता. रामटेक) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे घडली हाेती. त्या जखमीचा शनिवारी (दि. २०) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दाेन्ही आराेपींची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांनी दिली.
विश्वास मेश्राम (३४) असे मृताचे तर अमाेल बागडे (२५) व अश्विन बागडे (२१) अशी अटकेतील आराेपी भावांची नावे आहेत. तिघेही हिवराबाजार, ता. रामटेक येथील रहिवासी आहेत. विश्वासने अमाेल व अश्विनच्या बहिणीसाेबत प्रेमविवाह केल्याने त्यांचे आपसात भांडण हाेते. ते शेजारी राहात असून, अमाेल व अश्विनने त्यांच्या घराचे बांधकाम सुरू केल्याने त्यांनी अंजली मेश्राम यांच्या भाडेकरूच्या परवानगीने घरासमाेर गिट्टीचा ढीग टाकला हाेता.
याच ढिगावरून त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. विश्वासने अमाेलला मारहाण करायला सुरुवात करताच अश्विनने घरातून सब्बल आणली आणि विश्वासच्या डाेक्यावर वार केले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती केले हाेते. तिथे त्याचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना घटनेच्या रात्रीच अटक केली हाेती. रामटेक येथील न्यायालयाने दाेन्ही आराेपींना जामीन नाकारत न्यायालयीन काेठडी सुनावल्याने त्यांची रवानगी आधीच नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली हाेती. त्यातच देवलापार पाेलिसांनी दाेन्ही आराेपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.