जिन्यावरून पडल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:55+5:302021-06-29T04:07:55+5:30

नागपूर : कळमन्यातील पुंजाराम वाडी भागात राहणारे विष्णू बघेला मारकंडे (वय ४५) यांचा जिन्यावरून घसरून पडल्याने मृत्यू झाला. रविवारी ...

Death by falling down a ladder | जिन्यावरून पडल्याने मृत्यू

जिन्यावरून पडल्याने मृत्यू

Next

नागपूर : कळमन्यातील पुंजाराम वाडी भागात राहणारे विष्णू बघेला मारकंडे (वय ४५) यांचा जिन्यावरून घसरून पडल्याने मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

महिलेने लावला गळफास

नागपूर : जयताळ्यातील जुनी वस्तीत राहणाऱ्या निर्मला रमेश डोंगरे (वय ५६) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. अजय रमेश डोंगरे (वय ३६) यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. निर्मला यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

----

कुख्यात मुबारक हद्दपार

नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड शेख मुबारक शेख हयात (वय ३०) याला नागपुरातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या आदेशानुसार मुबारकला त्याच्या अमरावती येथील नातेवाईकांकडे रविवारी नेऊन सोडण्यात आले.

-----

Web Title: Death by falling down a ladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.