नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 08:21 PM2019-04-25T20:21:39+5:302019-04-25T20:23:19+5:30

मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती.

Death of Gani accused of Mumbai blast in Nagpur Central Jail | नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील मुंबई स्फोटाचा आरोपी गनीचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकृती अस्वास्थ्यामुळे दगावला : कारागृह प्रशासनात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईसह अवघ्या देशाला हादरे देणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा अखेर आज येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला. पॅरालिसिस झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्याची प्रकृती चांगली नव्हती.
मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गनीला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१२ ला त्याला येरवडा कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता.
अटक केल्यानंतर तपास यंत्रणांकडे गनीने आरडीएक्स पेरून मुंबईतील सेंच्युरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली दिली होती. स्फोट कसे घडवून आणले, कट कुठे आणि कसा रचला, त्याचीही माहिती त्याने तपास यंत्रणेकडे दिली होती. या स्फोटात ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. गनीचा केवळ याच स्फोटात नव्हे तर मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटातही सहभाग असल्याचे सांगितले जात होते. पाकिस्तानच्या मदतीने या स्फोटाचे कटकारस्थान रचणारा दाऊद इब्राहिम हा त्यावेळी पळून गेला होता. तर, गनीसोबत नंतर क्रमश: याकूब मेमन आणि अन्य काही जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. याकूबला या स्फोटाच्या आरोपात नागपूर कारागृहात फाशी देण्यात आले होते. गनीसोबत फाशी तसेच नंतर आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेले अनेक आरोपी अजून नागपूरच्या कारागृहात बंदिस्त आहेत, हे विशेष !
अब्दुल गनीला वर्षभरापूर्वी पॅरालिसिसचा अटॅक आला होता. बरेच दिवस तो बेडवरच होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला चालता येत असले तरी त्याची प्रकृती सारखी ढासळतच होती. २२ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला दुसºया दिवशी सुटी मिळाली. त्यानंतर कारागृहातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (२५ एप्रिल) दुपारी ११.४० ला त्याची प्रकृती ढासळली. तो बेशुद्ध पडल्यामुळे त्याला पुन्हा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कारागृह प्रशासनात धावपळ
मुंबई स्फोटाच्या आरोपीचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच प्रशासनात धावपळ निर्माण झाली. कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी लगेच उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांना तर देसाई यांनी कारागृह प्रशासनातील पुणे, मुंबईच्या शिर्षस्थांना ही माहिती कळविली. गनीच्या मुंबईतील नातेवाईकांनाही कळविण्यात आले. ते येथे रात्री उशिरापर्यंत दाखल होण्याची शक्यता कारागृह प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Death of Gani accused of Mumbai blast in Nagpur Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.