अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हृदय विकाराने मृत्यू; मनपा कार्यालयावर मृतदेह आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 05:45 PM2021-02-09T17:45:20+5:302021-02-09T17:46:18+5:30

Nagpur News : महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती केली.

Death by heart attack due to encroachment removal order; body brought to the corporation | अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हृदय विकाराने मृत्यू; मनपा कार्यालयावर मृतदेह आणला

अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे हृदय विकाराने मृत्यू; मनपा कार्यालयावर मृतदेह आणला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:  महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी पारडी, वाठोडा भागातील अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे वृत्त वाचून गिरीश धर्मा (५०) याचा मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.असा आरोप करीत या परिसरातील नागरिकांनी गिरीश वर्मा यांचा मृतदेह महापालिका मुख्यालयात आणला आहे . 


महापौर व मनपा प्रशासनाच्या विरोधात नागरिकांची जोरदार नारेबाजी सुरू आहे गिरीश वर्मा यांनी रजिस्ट्री करून प्लॉटची बारा वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे बांधकामावर पाणी मारीत असताना पेपरमधील गुन्हे दाखल करण्याचे वृत्त वाचले याचा त्यांना धक्का बसला असा आरोप गिरीश वर्मा यांचे सुपुत्र प्रतीक वर्मा यांनी केला आहे.  गुन्हे दाखल होण्याच्या आदेशामुळे त्यांना धक्का बसला आहे.  


वर्मा यांच्या मृत्यूला महापौरच जबाबदार आहे त असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे  या भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी शेत मालकाकडून प्लॉट खरेदी केले आहे. त्यांच्याकडे जागेच्या रजिस्ट्री आहे यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. असे असतानाही आमचे अतिक्रमण कसे असा सवाल आंदोलकांनी केला आहे.

Web Title: Death by heart attack due to encroachment removal order; body brought to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर