पतीचा अपघातात मृत्यू : पत्नीला ९० लाखांची भरपाई मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 08:28 PM2018-01-25T20:28:55+5:302018-01-25T20:31:00+5:30

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने एका प्रकरणात अर्जदार महिलेला ९० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

Death in husband's accident: wife gets compensation of Rs 90 lakh | पतीचा अपघातात मृत्यू : पत्नीला ९० लाखांची भरपाई मंजूर

पतीचा अपघातात मृत्यू : पत्नीला ९० लाखांची भरपाई मंजूर

Next
ठळक मुद्देनागपूर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निकाल

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : मोटार अपघात दावा न्यायाधिकरणने एका प्रकरणात अर्जदार महिलेला ९० लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.
स्वाती गमालपटी असे अर्जदार महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचा २५ जुलै २०१५ रोजी अपघातात मृत्यू झाला. पतीने इफको टोकिओ जनरल इन्श्युरन्स कंपनीकडून विमा घेतलेला होता. परिणामी, गमालपटी यांनी भरपाई मिळण्यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. गेल्या ५ जानेवारी रोजी न्यायाधिकरणने अर्ज मंजूर करून गमालपटी यांना ९० लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश विमा कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीने त्याच दिवशी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विलास डोंगरे यांच्याकडे या रकमेचा धनादेश दिला. हा धनादेश बुधवारी न्या. डोंगरे यांच्या हस्ते गमालपटी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश कुणाल जाधव, गमालपटी यांचे वकील अ‍ॅड. पी. एस. मिराचे, विमा कंपनीचे अधिकारी भंडारी, अमोल बिडवई, पांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Death in husband's accident: wife gets compensation of Rs 90 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.