नागपूरच्या महाराजबागेतील प्राणी संग्रहालय येथे बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 02:50 PM2018-04-07T14:50:27+5:302018-04-07T14:50:52+5:30
महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचे शनिवारी निधन झाले. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराजबाग प्राणी संग्रहालयात वास्तव्यास असलेल्या एका बिबट्याचा शनिवारी मृत्यू झाला. गेल्या १० दिवसापासून तो आजारी असून त्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्याला सलाईन लावल्याचीही माहिती आहे. अखेर आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्याने अंतिम श्वास घेतला.
एक आठवड्यापूर्वी २९ मार्च रोजी जाई नावाच्या वाघिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर लागलीच ही घटना घडल्याने वन्य प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
महाराजबागेचे अधिकारी डॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा १३ जून १९९९ रोजी महाराजबागेतच जन्म झाला होता. गोपाल व जुली हे त्याचे आईवडील असल्याचे सांगण्यात येत आहे. जन्मापासूनच तो महाराजबागेत वास्तव्यास होता. साधारणत: १९-२० वर्ष हे बिबट्याचे आयुष्यमान समजले जाते. लहानपणापासून तो महाराजबागेतच राहिल्याने येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याचा लळा होता. त्यामुळे त्याचा मृत्यु येथील कर्मचाऱ्यांसाठी दु:खदायकच आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.