कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

By सुमेध वाघमार | Published: July 20, 2023 07:15 PM2023-07-20T19:15:56+5:302023-07-20T19:16:50+5:30

आतापर्यंत चार रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्ण मेडिकलमध्ये उपचाराखाली आहेत.

Death of 26-year-old youth due to cholera, incident in Nagpur | कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

googlenewsNext

 
नागपूर : पावसामुळे अनेक आरोग्य समस्यांनी डोके वर काढायला सुरूवात केली आहे. दूषीत पाणी व अन्नामुळे आजार वाढले आहेत. विशेषत: पटकी म्हणजे ‘कॉलरा’ हा संसर्गजन्य आजाराचे रुग्ण दिसून येत आहेत. या आजाराने २६ वर्षीय तरुणाचा जीव गेला. शिवाय, आतापर्यंत चार रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्ण मेडिकलमध्ये उपचाराखाली आहेत.

‘व्हायब्रियो कॉलरी’ नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलºयाची लागण होते. कॉलराचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्न ग्रहण केल्याने होतो. हा आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात (मेडिकल) कळमेश्वर येथील एका २६ वर्षीय तरुणाचा ‘कॉलरा’ने मृत्यू झाला. या हा वर्षातील पहिला मृत्यू आहे. 

 - उपचार न झाल्यास मृत्यूचा धोका
मेडिकलचा औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले, कॉलराच जीवाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा आतड्यामध्ये त्वरीत पसरतो आणि काही तासातच शरीरातील पूर्ण पाणी शोषून घेतो. याची लक्षणे दिसताच उपचार न घेतल्यास किंवा त्याकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यूचा धोका संभवतो.
 

Web Title: Death of 26-year-old youth due to cholera, incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.