पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Published: October 21, 2023 06:52 PM2023-10-21T18:52:36+5:302023-10-21T18:52:49+5:30
पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीकाम करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २० ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर: पहिल्या माळ्यावरून पडून मिस्त्रीकाम करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी २० ऑक्टोबरला दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. संतोष गेंदलाल चौरागडे (वय ४०, रा. कटंगी, मोरगाव, जि. गोंदिया) ह. मु. नवकन्यानगर भरतवाडा कळमना असे मृत्यू झालेल्या मिस्त्रीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अयोध्यानगर येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र जवळ राऊत यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु होते.
तेथे संतोष हे मिस्त्रीकाम करीत होते. ते पहिल्या माळ्यावरून प्लायवुड खाली फेकत होते. अचानक त्यांचा तोल गेल्यामुळे ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.