इंडोरामा कंपनीतील दुर्घटनेत जखमी झालेल्या कामगाराचा मृत्यू, पीडित रामटेके परिवाराला १० लाखांची मदत
By नरेश डोंगरे | Published: March 28, 2024 09:10 PM2024-03-28T21:10:54+5:302024-03-28T21:11:09+5:30
Nagpur News: बुटीबोरीतील एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा अखेर खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. कन्हैय्यालाल रामचंद्र रामटेके (वय ४३) असे मृत कामगाराचे नाव असून ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहिवासी होते.
- नरेश डोंगरे
नागपूर - बुटीबोरीतील एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा अखेर खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. कन्हैय्यालाल रामचंद्र रामटेके (वय ४३) असे मृत कामगाराचे नाव असून ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहिवासी होते.
इंडोरामा कंपनीत २१ मार्चला दुपारी १२.१० वाजता कंपनीत पहिली दुर्घटना झाली. वेल्डिंगचे काम करताना अचानक आग लागून चार कर्मचारी होरपळले. तर, दुसऱ्या दिवशी २२ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता झालेल्या दुर्घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले. त्यात कन्हैय्यालाल रामटेके यांचाही समावेश होता. त्यांच्यावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी रामटेके यांचा मृत्यू झाला. तर, बाकी कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.
इंडोरामा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन) रियान पॉल यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. कंपनीत कार्यरत असलेल्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या सुविधांमध्ये उच्चस्तरिय बदल करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत तसेच सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम केले जात असून त्यांना चांगली आरोग्य सेवा तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. मृत कर्मचारी कन्हैय्यालाल रामटेके यांच्या परिवाराला कायदेशिर लाभांव्यतिरिक्त कंपनीकडून १० रुपयांची मदत देण्यात आली आहे.